Memes on twitter over jio cinema : FIFA World Cup 2022 कतारमध्ये सुरू झाले असून जिओवर त्याचे थेट प्रक्षेपण पाहायला मिळते. मात्र, काल थेट प्रक्षेपणादरम्यान व्यत्यय आल्याच्या तक्रारी सोशल मीडियावर झळकू लागल्या. युजर्सना लाइव्ह स्ट्रिमिंगचा दर्जा घसरल्याचा आणि अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावरून जिओकडे आपली नाराजी व्यक्त केली. या प्रकारानंतर ट्विटरवर जिओ सिनेमा ट्रेंड करत होते. जिओ सिनेमामुळे झालेल्या गैरसोयीने नाराज झालेल्या चाहत्यांनी जिओची खिल्ली उडवली. युजर्सनी पोट धरून हसवतील असे जिओ सिनेमाविरुद्ध मिम्स बनवून आपली भडास काढली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Akhil Chauhan नावाच्या ट्विटर युजरने एक मिम शेअर करत जिओची थट्टा केली आहे. जिओ सिनेमावर फिफाचे प्रक्षेपण का फ्री आहे? याचे कारण त्यांनी एक मिम प्रसिद्ध करून सांगितले आहे. युजरने ट्विटमध्ये, “यामुळे ते मोफत आहे” असे पोस्ट करत चार सर्व्हर दाखवले. नेटफ्लिक्स, गुगल, स्टिम या कंपन्यांच्या नावासह दाखवण्यात आलेले सर्व्हर आधुनिक, भव्य आणि चांगल्या खोलीत असल्याचे दाखवले, तर जिओच्या नावासह दर्शवण्यात आलेले सर्व्हर लहाणसे सीपीयू आणि त्यास थंडे करण्यासाठी लावण्यात आलेल्या पंख्यासह दाखवण्यात आले. हे मिम नेटकऱ्यांना पोट धरून हसवत आहे.

(भन्नाट दिसतो VIVO X 90, लाँच पूर्वी टीझर जारी, जाणून घ्या फीचर्स)

DeadInside नावाच्या ट्विटर युजरने एक मिम शेअर केले असून ते हेरा फेरी चित्रपटातील अभिनेता परेश रावल आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्यातील मजेदार संभाषणाबाबत आहे. जिओ सिनेमावर फुटबॉलचे प्रक्षेपण पाहिल्यानंतर सोनी लिव्हला आपण वाईट समजत होतो. मात्र ते चांगले असल्याची भावाना या मिममधून व्यक्त करण्यात आली आहे.

Tackle From Behind या ट्विटर हँडलने अभिनेता अमिताभ बच्चन यांचा कौन बनेगा करोडपती सेटवरील एक छायाचित्र ज्यामध्ये ‘यहा लेंगे एक छोटासा ब्रेक’ असे मजकूर लिहून आहे ते शेअर केले आहे. प्रत्येक ३० मिनिटांनी जिओची काय अवस्था असते, असे या ट्विटमधून दाखवण्यात आले आहे.

Vishal Verma नावाच्या युजरने मिम पोस्ट करून जिओ सिनेमाच्या आयोजनावर प्रश्न उपस्थित केला आहे. ‘ये है तुम्हारी फूल प्रुफ प्लॅनिंग’ असे मजकूर असलेले पोस्ट शेअर करून आयोजनावर नाराजी व्यक्त केली आहे.

liafuS नावाच्या युजरने या प्रकरणाला डोकेदुखीशी जोडले आहे. त्याने डोकेदुखीच्या कारणांमध्ये जिओ सिनेमाचा देखील समावेश केला आहे.

जिओने ट्विट करून मागितली माफी

जिओने ट्विटरवरून “प्रिय जिओसिनेमा चाहत्यांनो, तुम्हाला सामन्याचा आनंद घेता यावा म्हणून आम्ही सतत प्रयत्न करत आहोत. तुम्ही तुमचे अ‍ॅप अपडेट करून फिफा विश्वचषक कतार २०२२ चा आनंद घेऊ शकता. तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल क्षमस्व,” अशी पोस्ट करत माफी मागितली होती.

वेगवान इंटरनेट कनेक्शन असतानाही अडचणी

(थंडीत मोबाईलचीही बिघडते प्रकृती; उद्भवतात ‘या’ समस्या, नुकसान टाळण्यासाठी हे करा)

वेगवान इंटरनेट कनेक्शन असलेल्यांनाही सामने लाइव्ह पाहताना अडचणी आल्याचे सोशल मीडियावरून सांगण्यात आले आहे. अनेक चाहत्यांनी ट्विटरवरून यासंदर्भातील नाराजी व्यक्त केली आहे. विश्वचषक पाहण्याचा सर्व उत्साह या गोंधळामुळे मावळल्याचे सांगत अनेकांनी या सेवेबद्दल नाराजी व्यक्त केली. जिओनेही ट्वीटरवरून या तक्रारींची दखल घेतल्याचे ट्विटरवर दिसून आले. आमची टीम या तांत्रिक अडचणीवर काम करत असून बफरींगसंदर्भातील समस्या सोडवत आहोत, असे सामना सुरू असताना पोस्ट केले होते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twitter memes over jio cinema poor fifa world cup streaming ssb
Show comments