उर्जित पटेल यांनी तडकाफडकी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरपदाचा राजीनामा दिल्यानंतर गव्हर्नरपदी शक्तिकांत दास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शक्तिकांत दास माजी अर्थ सचिव आहेत. सध्या ते अर्थ आयोगाचे सदस्य असून त्यांच्या नियुक्तीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नोटबंदीच्या काळात सरकारी धोरणांचा चेहरा म्हणून दास यांच्याकडे पाहिले जायचे. नोटबंदीच्या काळामध्ये सरकारने घेतलेले निर्णय आणि रोज बदलणारे नियम पत्रकारपरिषदेच्या माध्यमातून सामान्यांपर्यंत पोहचवण्याचे काम दास यांनी केले. दास यांची नियुक्ती गव्हर्नरपदी झाल्यानंतर नेटकऱ्यांनी याच पत्रकार परिषदांमधील व्हिडीओ क्लिप्स व्हायरल करत दास यांच्या नियुक्तीबद्दल प्रश्न उपस्थित केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एक माजी सनदी अधिकारी असणाऱ्या दास यांची थेट आरबीआयच्या गव्हर्नरपदी नियुक्ती झाल्याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. दास यांच्या संदर्भातील अनेक गोष्टी नेटकऱ्यांनी पोस्ट करत त्यांची नियुक्ती योग्य नसल्याचे मत मांडले आहे. पाहूयात असेच काही व्हायरल झालेले ट्विटस

तर हे आहेत आपले नवीन गव्हर्नर

मला पडलेले भयंकर स्वप्नही यापेक्षा जास्त तर्कशुद्ध असते

दोन वर्षापूर्वी दास यांनी केलेले ट्विटस

काही जणांनी आरबीआयच्या गव्हर्नरपदी विराजमान होण्यासाठी लागणाऱ्या शैक्षणिक पात्रतेचीही चर्चा केली. या पुर्वी गव्हर्नर राहिलेल्या रघुराम राजन आणि उर्जित पटेल यांच्याप्रमाणे दास यांचे शिक्षण अर्थशास्त्र विषयात झालेले नाही किंवा त्यांनी उद्योग अथवा अर्थशास्त्राशी संबंधित विषयात पदवीही मिळवलेली नाही असेही नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

दास माझ्या कॉलेजमध्ये इतिहास शिकलेत

मागील काही आरबीआय गव्हर्नसची शैक्षणिक पात्रता

एमए इन हिस्ट्री हाच योग्य उमेदवार

दास यांच्या शिक्षणाबद्दल नेटवर इतकी चर्चा झाली की गुगल सर्चमध्येही अनेकांनी दास यांचे शिक्षण किती झाले आहे हे सर्च केले. गुगल सर्चच्या ग्राफमध्ये नेटकऱ्यांची दास यांचे शिक्षण जाणून घेण्याबद्दलची उत्सुकता दिसून येते.

मात्र नेटकरी ज्याप्रमाणे दास यांनी घेतलेली सर्वोच्च पदवी ही ‘मास्टर्स इन हिस्ट्री’ असून ती गव्हर्नर होण्यासाठी पुरेशी नाही हा केलेला दावा चुकीचा आहे. दास यांच्याबद्दलच्या विकिपीडीया पेजेवरील माहितीनुसार दास यांनी बंगळुरु येथील आयआयएममधून फायनान्स मॅनेजमेन्टचा कोर्स केल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच त्यांनी एनआयबीएममधूनही डेव्हलपमेन्ट बँकिंग अॅण्ड इन्सटीट्यूशनल क्रेडीट या विषयातही कोर्स केला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये त्यांनी याबद्दलचे प्रशिक्षणही घेतल्याचे बोलले जात आहे. आरबीआयच्या गव्हर्नरपदी नियुक्त होण्यासाठी अर्थशास्त्राशी संबंधित विषयामध्ये पदवी असणे बंधनकारक नाही. त्यामुळेच ही नियुक्ती नियमांमध्ये बसणारीच आहे.