Social Viral Post on Indian Tax System: आपण भरमसाठ कर भरूनही आपल्याला चांगली हवा, चांगलं पाणी, चांगलं जीवनमान मिळत नसल्याची तक्रार बरेचजण बोलून दाखवतात. खराब रस्ते, अपुरं पाणी, भरपूर प्रदूषण आणि जोडीला प्रत्येकी किमान एक तरी व्याधी अशा सगळ्या परिस्थितीत बँकेतली जमापुंजी जरी कमी होत असली, तरी सरकारला दरवर्षी भरावा लागणारा कर मात्र कमी होत नसल्याचं चित्र आहे. यावर तोडगा कसा काढता येईल, यासाठी अनेक स्तरांवर चर्चा आणि शिफारसी केल्या जात आहेत. पण एका एक्स युजरनं दिलेला सल्ला मात्र नेटिझन्सच्या जिव्हारी लागला असून त्यावरून युजर्समध्येच जुंपल्याचं दिसून येत आहे.

सिद्धार्थ सिंह गौतम असं या युजरचं नाव असून दोन दिवसांपूर्वी म्हणजे १ डिसेंबर रोजी या व्यक्तीने एक्सवरील आपल्या अकाऊंटवर केलेली एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. या पोस्टला आत्तापर्यंत २९ हजार युजर्सनं लाईक केलं असून ३ हजाराहून जास्त युजर्सन रीशेअर केलं आहे. हजारोच्या संख्येनं त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. या प्रतिक्रियांमध्ये युजर्स आपापसांत भिडल्याचं दिसून येत आहे.

sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले, “मला एक उदाहरण दाखवा की…”
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Dev deepawali 2024
देव दिवाळीपासून शनी-गुरूचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी
Budhaditya rajyog in scorpio
‘या’ ३ राशी कमावणार बक्कळ पैसा; मंगळाच्या राशीतील बुधादित्य राजयोग देणार पैसा, प्रेम आणि प्रसिद्धी
Vinayak Chaturthi special 5th November Rashi Bhavishya
५ नोव्हेंबर पंचांग: विनायक चतुर्थीला ‘या’ राशींना होणार फायदा, भाग्याची साथ ते धनलाभाचे योग; वाचा तुमच्या नशिबात कसं येईल सुख?
mangal planet transit in cancer
‘या’ तीन राशीच्या लोकांना होणार आकस्मिक धनलाभ; पुढील १४२ दिवस मंगळाची असणार कृपा
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल

काय आहे व्हायरल पोस्टमध्ये?

या पोस्टमध्ये संबंधित व्यक्तीने भारत सोडून कायमचं सिंगापूरला स्थलांतरित व्हायचा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे. “मी २०२५ मध्ये भारत कायमचा सोडून सिंगापूरला स्थलांतर करणार आहे. यासंदर्भातली कागदपत्रांची जमवाजमव चालू आहे. इथल्या राजकारण्यांना मी अजून सहन करू शकत नाही. माझ्या कमाईच्या ४० टक्के कर भरूनही प्रदूषित हवेत मी जगू शकत नाही. या परिस्थितीची जबाबदारी उचलायला कुणीच तयार नाही. माझा सगळ्यांना प्रामाणिक सल्ला आहे, तुमच्याकडे चांगले पैसे असतील, तर भारत सोडा”, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

या पोस्टवरून युजर्समध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काही युजर्सनं या भूमिकेचं समर्थन केलं आहे तर काहींनी तीव्र विरोध केला आहे. तर काही समर्थन करणाऱ्यांना इतर नेटिझन्स आपापले मुद्दे मांडून विरोध करत आहेत. त्यामुळे या पोस्टवरून सध्या सोशल मीडियावर व्यापक चर्चा सुरू झाली आहे. एका युजरनं पोस्टवर “देश सोडण्यापेक्षा त्यात सुधारणा करण्यासाठी तुम्ही उपाय का सुचवत नाही?” असा प्रश्न केला. त्यावर “राजकारण्यांचे खिसे भरण्यासाठी कर भरूनही हवेची गुणवत्ता सुधारत नसेल, तर सामान्य व्यक्तीने काय करायचं?” असा सवाल या युजरनं केला.

Social Viral: पुणेकरांचा नाद करायचा नाय! पेट्रोल पंपावर लिहिली खतरनाक पुणेरी पाटी; वाचून तुम्हीही म्हणाल “जशास तसं”

या चर्चेवर “सिंगापूरमध्ये कमी कर आहे का? उलट सिंगापूर जगभरातील सर्वाधिक कर आकारणाऱ्या देशांमध्ये आहे”, असं एका युजरनं म्हणताच दुसऱ्यानं “पण तिथे राहणीमानाचा दर्जा तरी चांगला आहे”, असं म्हणत दुसरी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.