पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. ८ नोव्हेबरच्या रात्री अचानक देशवासियांशी संवाद साधत पंतप्रधान मोदींनी नोटाबंदीच्या निर्णयाची घोषणा केली. त्यामुळे पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा ‘कागज का तुकडा’ झाल्या. भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर करताना पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा बँकेत बदलून घेण्याची सूचना केली. ३० डिसेंबरपर्यंत बँकेतून नोटा बदलून मिळतील, असे मोदींनी सांगितले होते. यानंतर देशातील कोट्यवधी लोक बँकांबाहेरील रांगांमध्ये उभे राहिले. या दरम्यान पार पडलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नोटाबंदीचा उल्लेख ‘गैरव्यवस्थापनाचा नमुना’ असा केला होता. ‘नोटाबंदी म्हणजे संघटित लूट’ असल्याची टिकादेखील मनमोहन सिंग यांनी केली होती.

नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी पंतप्रधान मोदींनी देशवासियांकडे पन्नास दिवसांची मुदत मागितली होती. मोदींनी मागितलेली ही मुदत संपली आहे. आता पंतप्रधान मोदी ३१ डिसेंबरला देशवासियांशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान मोदी त्यांच्या भाषणात काय बोलणार ?, एखादी नवी घोषणा करणार का ?, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सोशल मीडियावर याबद्दल मोठी चर्चा रंगताना दिसते आहे. मोदी ३१ डिसेंबरला नेमके काय बोलतील, याचे आडाखे बांधायला सुरुवात केली आहे. अनेक ट्विटर वापरकर्त्यांनी हटके ‘अंदाजा’त मोदींच्या भाषणाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला आहे.

https://twitter.com/Madan_Chikna/status/814497942862118919

https://twitter.com/GappistanRadio/status/814352773017837569

Story img Loader