ट्विटरवर अधिकृत खात्याची विश्वासर्हातता दर्शवणारी ब्लू टिक हटवण्याचा मोठा निर्णय ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी घेतला होता. ब्लू टिकचे सबस्क्रिप्शन घेतलेल्यांनाच ही सुविधा देण्यात येणार असल्याचाही निर्णय झाला आहे. त्यानुसार, दोन दिवसांपूर्वी भारतासह अनेक देशातील नामवंत विचारवंत, कलाक्षेत्रातील मंडळी, राजकीय नेत्यांसह अनेकांचे ब्लू टिक हटवण्यात आले होते. ज्यांनी सबस्क्रिप्शनचे पैसे भरले त्यांनाच ही सुविधा देण्यात आली. परंतु, काही खातधारेकांना सबस्क्रिप्शन घेताही त्यांचे ब्लू टीक परत आल्याचं स्पष्ट झालं आहे. एनडीटीव्हीने रोलिंग स्टोनच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

काही खातेधारकांनी दावा केला आहे की त्यांच्या खात्यावरील ब्लू टिक पैसे न भरताही पुन्हा परत आले आहे. या खातेधारकांना १० लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. परंतु, १० लाखांहून अधिक खातेधारकांना ब्लू टिक परत मिळत असेल तर अमिताभ बच्चन यांनाही हे ब्लू टिक मोफत परत मिळणे गरजेचे होते. परंतु, त्यांनी पैसे भरून त्यांचं खातं व्हेरिफाईड करून घेतलं आहे. तसंच, विराट कोहली, आलिया भट्ट यांसारख्यांचेही ब्लू टिक परत आले आहेत. परंतु, त्यांनी ते पैसे भरून मिळवले आहेत की कसे याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

@Valkyrae या खातेदाराने दावा केला आहे की त्यांनी ब्लू टिकसाठी पैसे दिलेले नाहीत, तरीही त्यांच्या खात्यावर ब्लू टिक परत आले आहे. अशाचप्रकारे अनेकांनी हा दावा केला आहे.

१० लाखांहून अधिक फॉलोवर्स असणाऱ्या अनेक पत्रकार आणि विचारवंतांनाही कोणतेही शुल्क न भरता ब्लू टीक परत मिळाले आहे. परंतु, यामागंच नेमकं गौडबंगाल काय आहे याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.

काही लोकांना ब्लू टिक पुन्हा कसे मिळत आहे किंवा पैसे न भरताही त्यांचे ब्लू टिक कसे अबाधित राहिले याबाबत कोणतीही अधिकृत माहिती ट्विटर आणि एलॉन मस्क यांच्याकडन देण्यात आलेली नाही. त्यामुळे या मोफत ब्लू टीकचा प्रश्न अद्यापतरी अनुत्तरीतच आहे.

Story img Loader