ऑर्डर केलेले पदार्थ पॅकेटमधून बाहेर काढून खातानाचा डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ऑनलाइन फूड ऑर्डर कंपनी झोमॅटोने या व्यक्तीला कामावरुन काढून टाकले आहे. तसेच या पुढे ऑर्डर करण्यात आलेल्या पदार्थांना पॅक करण्यासाठी टॅम्पर प्रूफ टेप आणण्याचा निर्णयही झोमॅटोने घेतला आहे. असे असले तरी अद्याप या प्रकरणावरून कंपनीला ट्रोल करणे सुरुच आहे.

नुकताच सोशल मीडियावर मदुराई येथील एका डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय ऑर्डर केलेले पदार्थ पॅकेटमधून बाहेर काढून खाताना दिसत आहे. इतकंच नाही तर खाऊन झाल्यावर ते पुन्हा पॅक करुन त्या पॅकेटमध्ये ठेवतो. ग्राहकाला ही बाब कळू नये यासाठी आपल्याकडील असलेल्या टेपने पॅकेट पुन्हा पॅकदेखील करुन ठेवत असल्याचे दिसत आहे. हाच व्हिडीओ पोस्ट करत अनेकांनी झोमॅटोला ट्रोल केले आहे. पाहुयात असेच काही ट्विटस

जेव्हा तुम्ही खूप सारे कुपन कोड्स वापरता

तो फक्त अन्न चांगलयं का तपासून पाहत होता

झोमॅटोने फूड टेस्टींग सेवा सुरु केलीय का?

काय बोलणार

ही झोमॅटो गोल्ड सेवा आहे

डिलिव्हरी बॉयची पहिली प्रतिक्रिया

महाराजांना दिली जाणारी सेवा थेट झोमॅटोवरून

दरम्यान झोमॅटोने यासंदर्भात एक ब्लॉग लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अशा प्रकारच्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत असंही झोमॅटोने सांगितलं आहे. ही अत्यंत दुर्देवी आणि दुर्मिळ घटना असल्याचंही झोमॅटोने म्हटलं आहे. दरम्यान कंपनीने कारवाई करत व्हायरल व्हिडीओत दिसणाऱ्या डिलिव्हरी बॉयला कामावरुन काढून टाकलं आहे. या घटनेमुळे आमची प्रशिक्षण आणि प्रक्रिया अजून मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे अशी माहिती झोमॅटोने दिली आहे.