‘ठाकरे’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंग दरम्यान रंगलेल्या मानापमान नाट्यानंतर संजय राऊत यांनी केलेले ट्विट चर्चेचा विषय ठरला आहे. ‘लहान मेंदूत अहंकाराचा कचरा साचला की संयम आणि कृतज्ञता या शब्दांचे मोल नष्ट होते. ठाकरे चित्रपटाचा हाच संदेश आहे’, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. या ट्विटच्या माध्यमातून संजय राऊत यांनी दिग्दर्शक अभिजित पानसेंवर निशाणा साधल्याची चर्चा आता रंगली आहे. मात्र या ट्विटवरून आता सोशल नेटवर्किंगवर संजय राऊतच ट्रोल होताना दिसत आहेत.
ठाकरे चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान बुधवारी रात्री दिग्दर्शक अभिजित पानसे आणि निर्माते संजय राऊत यांच्यातील वाद हा चर्चेचा विषय ठरला होता. दिग्दर्शक अभिजित पानसे हे चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग सुरू असताना तडकाफडकी उठून गेले. अपमानित झाल्याने पानसे हे तेथून उठून गेल्याचे सांगण्यात येते. सिनेमागृहाबाहेर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसमोरच संजय राऊत आणि पानसे यांच्यात वाद झाला. यानंतर पानसे कुटुंबासह तिथून निघून गेले. या वादाचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी गुरुवारी सकाळी केलेले ट्विट हे सर्वांचेच लक्ष वेधून घेणारे ठरले. ‘लहान मेंदूत अहंकाराचा कचरा साचला की संयम आणि कृतज्ञता या शब्दांचे मोल नष्ट होते. ठाकरे चित्रपटाचा हाच संदेश आहे’, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
ठाकरे
The Biopic…
लहान मेंदूत अहंकाराचा कचरा साचला की संयम आणी कृतज्ञता या शब्दांचे मोल नष्ट होते.
ठाकरे
चित्रपटाचा हाच संदेश आहे— Sanjay Raut (@rautsanjay61) January 24, 2019
राऊत यांनी ट्विटमध्ये पानसे यांचा उल्लेख केलेला नाही. त्यांनी चित्रपटातून काय संदेश दिला हे सांगतानाच पानसे यांना चिमटा काढल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. मात्र आता हेच ट्विट राऊतांवर बॅकफायर होताना दिसत आहे. अनेकांनी या ट्विटवर दिलेल्या प्रतिक्रियांमधून राऊतांविरोधातील रोष दिसून येत आहे. यामध्ये राऊतांचे हे ट्विट म्हणजे उतावळेपणाचे लक्षण असल्याचे काहींनी म्हटले आहे तर काहींनी हे संजय राऊत यांनी स्वत:चे केलेले वर्णन असल्याचा टोमणा लगावला आहे. पाहुयात काय म्हणाले आहेत नेटकरी राऊतांच्या या ट्विटला उत्तर देताना…
उतावळेपणाचे लक्षण
अजून @abhijitpanse यांनी कालच्या प्रसंगाबद्दल अवाक्षर सुद्धा काढले नाही. तुम्ही मात्र उतावळेपणा करून तुमच्या बुद्धीची अपात्रता दाखवून दिली.
असो सडलेले मेंदू.#ISupportAbhijeetPanse #म #MNS9SMS #मराठी pic.twitter.com/YNruJYoFLJ— संदिप होले 9(@SandipHole9) January 24, 2019
हे तर तुमचेचे वर्णन
स्वतःचे अप्रतिम आणि मोजक्या शब्दात वर्णन साहेब, मस्तच….
— रामा (@Niight_King) January 24, 2019
तुम्ही आपली पोळी भाजून घेतली
तुमच्या लहान मेंदुने खुप मोठे काम केले आणी दोन भावांमध्ये वितुष्ट आणुन आपली पोळी भाजुन घेतली
— राहुल (@romeo_rudrra) January 24, 2019
तुम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे मोल नष्ट केले
तुम्ही लाचारी पत्करून बाळासाहेबांच्या विचारांचे मोल कधीच नष्ट केले आहेत…
आणि चित्रपटा चा हाच संदेश आहे.
— महेश कदम (@maheshkadam999) January 24, 2019
तुमच्या डोक्यातील अहंकार बाहेर काढा
आधी तुमच्या डोक्यातील अहंकार बाहेर काढा
— AdeshDMore (@meAdeshMore) January 24, 2019
तुम्ही तरी अहंकाराची भाषा बोलू नका
तुम्ही तरी अहंकाराची भाषा बोलू नका.. चित्रपटाच्या दिग्दर्शकाला तुम्ही जाणूनबुजून डावलले आहे संपूर्ण जनतेला समजले आहे त्यामुळे सारवासारव करून काय उपयोग नाही
— Vaibhav Velapure (@VaibhavVelapur5) January 24, 2019
आरशासमोर ऊभे राहून ट्विट केल्या बद्दल आपल कौतुक
राऊत साहेब
आरशासमोर ऊभे राहून ट्विट केल्या बद्दल आपल कौतुक कराव तेवढ कमीच आहे— Chinmay Thite (@ThiteChinmay) January 24, 2019
तुम्हीच जबाबदार
आजच्या घडीला शिवसेनेतून अनेक तरुण कार्यकर्ते मनसेत प्रवेश करत आहेत. याचे प्रमुख कारण फक्त तुम्ही आहात.
शिवसेनेच्या बरबादीला तुमचा मोठा हातभार आहे. असच काम करत रहा.#ISupportAbhijeetPanse— संदिप होले (@SandipHole9) January 24, 2019
हा अहंकार आम्हाला दिसला
मग असाच अहंकार आम्हाला लहान मेंदूत दिसला ज्याने @abhijitpanse सरांचा अपमान केला.
— महेश गणपत रामाणे (@mayu_ramane) January 24, 2019
सेनेची प्रतिमा खराब करण्यात तुमचा हात
शिवसेनेची प्रतिमा खराब करण्यात तुमचा खूप मोठा हात आहे..दिग्दर्शकाचे काम झाले म्हणून आता त्याला हवं ते बोलताय. इतकं घाणेरडं राजकारण करणारा माणूस लोकांनी कधीच पाहिला नसेल.शिवसेना-मनसे यांच्यातल्या वादाला फक्त आणि फक्त तुम्हीच कारणीभूत आहात.
— Jay Pathare (@JayPathare4) January 24, 2019
संधी नाही प्रतिभा होती
प्रतिभेचा असा अपमान आपल्या शिवाय कोणी करूच शकत नाही..म्हणे मी संधी दिली!! प्रतिभा होती म्हणून दिली ना संधी? की विकत घेता का?#ISupportAbhijeetPanse
— Akshay kashid (@advAkshaykashid) January 24, 2019
स्वाभिमान गहाण ठेवलाय तुम्ही
कसले हे गलिच्छ राजकारण पण आम्हा मनसैनिकांना @mnsadhikrut, सामान्य जनतेला माहीत आहे हा आमच्या पानसे साहेबांचा हा सिनेमा आहे. तुमच्याकडून असलीच अपेक्षा होती मराठी माणसाला. खरंच, तुम्ही स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवलाय मोदी-शहा आणि फडन20 कडे.
बाकी पण तू सुपारी घेतलीस खरी सेना संपवायची— संजय नानासाहेब पाटील (@SNP_MNS) January 24, 2019
त्याच लहान मेंदूने सिनेमा दिग्दर्शित केला का
त्याच लहान मेंदूने ठाकरे सिनेमा दिग्दर्शित केला आहे #ISupportAbhijeetPanse
— Yashodeep Patil (@YashodeepPatil4) January 24, 2019
पानसेंनी सेनेला दिलेली शिकवण
खुर्चीवर लाथ कशी मारायची हे आज अभिजीत पानसेंनी शिवसेनेला दाखवलं…#ISupportAbhijeetPanse
— अभिजित बुरमेकर (@ABurmekar) January 24, 2019
शिवसेना संपावणारा
तुम्ही नेहमी बोलत “शिवसेना संपावणारा अजून जन्माला आला नाही” … थोडं चुकतंय .. १५ नोव्हेंबर १९६१ ला तुमचा जन्म झाला आहे ना .. शिवसेना संपवायला …!
— Tanaji Pise (@tanaji_pise) January 24, 2019
शिवसेनेची गत कौरवा सारखी होऊ नये
महाभारतातील शकुनी मामा होता तसाच शिवसेनेतील हा शकुनी मामा यांचा एकच उद्योग नुसत्या आगी लावणे आणि धुर निगाय लागला तर दुर थांबुन बोबलने।शेवटी एकच सांगेन शिवसेनेची गत कौरवा सारखी होऊ नये एवढच, कारण मा.बाळासाहेबांनी खुप मेहनतीने हा पक्ष उभा केला आहे ।
— Sanjaykumar Chavan (@sainju6Chavan) January 24, 2019
बदलेलेली हवा ओळखा साहेब
बदललेली हवा पण तुम्हाला कळत नाही ये @sanjayraut #ISupportAbhijeetPanse
— JAGDISH MAHALE (@JAGDISHMAHALE7) January 24, 2019
अभिजित पानसे हे चित्रपटाचे दिग्दर्शक असून ते सध्या मनसेत सक्रीय होते. अभिजित पानसे हे पूर्वी शिवसेनेत होते. भारतीय विद्यार्थी सेनेचे पदही त्यांच्याकडे होते. मात्र, शिवसेना पक्षश्रेष्ठींवर नाराज झाल्याने ते मनसेत गेले. स्क्रिनिंगदरम्यान झालेल्या वादानंतर मनसेचे नेतेही पानसे यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. त्यामुळे या चित्रपटामुळे मनसे विरुद्ध शिवसेना असा वाद रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.