अॅपल स्मार्टफोनची सध्या तुफान क्रेझ असली तरी या स्मार्टफोनची किंमत अधिक असल्यामुळे सामान्य लोकांना हा स्मार्टफोन खेरेदी करणे तसे अशक्यच आहे. या फोनचे नवीन व्हर्जन ज्यावळी बाजारात येते तेंव्हा सामान्य व्यक्तीमध्येदेखील स्मार्टफोनची उत्सुकता पाहायला मिळते. अॅपलचा आयफोन ७ बाजारात दाखल केला होता. हा मोबाईल लॉन्च होण्यापूर्वीच भारतीयांमध्ये कुतूहल पाहायला मिळाले होते. पण या स्मार्टफोनची किंमत जारी केल्यानंतर लोकांची झालेली निराशा आपल्याला नवीन नाही. पण सध्या दिवाळीच्या खरेदीच्या पार्श्वभूमीवर ट्विटरवर अॅपलच्या प्रोडक्ट खरेदी बाबत सध्या चर्चा रंगली आहे.

एका नेटीझन्सने तुम्ही तुमच्या बँक बॅलन्समध्ये अॅपलचे कोणते प्रोडक्ट खेरेदी करु शकता? असा प्रश्न विचारला आहे. जगातील प्रत्येक घटनेवर व्यक्त होण्याचा हजरजबाबीपणा असणाऱ्या नेटीझन्सनी या प्रश्नावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका ट्विटरकराने सफरचंदाचा फोटो शेअर केला आहे. तर काहींनी सफरंचंदापासून बनवण्यात आलेल्या खाद्यपदार्थांचे फोटो शेअर केले आहेत. ट्विटरकरांनी अॅपलच्या किंमती परवडणाऱ्या नसल्याचे सांगण्यासाठी एका वेगळ्या प्रकारे व्यक्त होताना दिसत आहेत.

अ‍ॅपलने बाजारात दाखल केलेला आयफोन ७ ची चांगलीच चर्चा रंगली होती. नेटीझन्सची उत्सुकता किंमती पाहून ओसरल्याचे पाहायला मिळाले होते. आयफोन ७ या स्मार्टफोनच्या किंमती अधिक असल्याते व्यक्त करण्यासाठी यापूर्वी देखील ट्विटरवर प्रतिक्रिया उमटल्या होत्या. हा स्मार्टफोन अॅपल कंपनीसाठी भविष्याची वाटचाल निश्चित करणारा असल्याचे मानले जाते. आयफोन ७ प्लसमध्ये कंपनीने काही महत्त्वपूर्ण बदल केले असून हे बदल आत्तापर्यंत आयफोन न वापरणाऱ्यांनाही मोहात पाडणारे आहेत. पण त्याची किंमत अधिक असल्याने तो घेणे मध्यमवर्गीयांना शक्य नाही. आयफोन ७ (३२ जीबी) मॉडेलची किंमत ६० हजारांपासून सुरू आहे, तर आयफोन ७ प्लसची किंमत ७२ हजारांच्या घरात आहे.

Story img Loader