मुकेश अंबानी यांनी गुरूवारी रिलाअन्स जीओ फोरजी सेवेचा शुभारंभ केला. ही सेवा पुढच्या आठवड्यात सुरू होणार आहे. त्याआधीच वेगवेगळ्या माध्यमांत या जीओ फोरजी सेवेची चर्चा सुरू झाली. या सेवेचे अनावर करणार असल्याचे सांगितल्यावरच रिलायन्स जीओ हा विषय ट्रेंडिगमध्ये होता. पण आता पुन्हा एकदा ट्विटरवर रिलायन्स जीओ फोरी जी विषय चर्चेत आला आहे. याला कारण म्हणजे या जीओच्या जाहिरातीत झळकलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी. या सेवेचे अनावरण करतात आपण नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाचे स्वप्न साकारण्यास मदत करत आहोत असे वक्तव्य अंबानी याने केले होते. त्यानंतर दुस-या दिवशीच या कंपनीच्या जवळपास सगळ्याच जाहिरात नरेंद्र मोदी झळकले. कदाचित या जाहिरातीत मोदींचा फोटा अनपेक्षित असल्याने ट्विटवर सकाळपासूनच मोदींना निशाणा बनवला जात आहे. या जाहिराती पाहून अनेकांनी #Ambani_प्रचारक_Modi असा हॅशटॅग वापरून मोदींवर निशाणा साधला आहे. तर #RelianceकाPM असे हॅशटॅग वापरूनही मोदींवर नेटीझन्स बरसत आहेत. या जाहिरातीत मोदींचा फोटा आहे त्यामुळे मोदी हे रिलायन्स कंपनीचे प्रचारक आहेत असे म्हणत मोदींची खिल्ली उडवली जात आहे. याआधी देखील मोदी आणि मुकेश अंबानी यांचे साटेलोटे असून अंबानीचा फायदा बघण्यासाठी मोदींनी त्यांना अनेक सवलती देऊन ठेवल्या आहेत असा आरोप देशभरातील अनेक विरोधी पक्ष नेत्यांनी केला होता.

Story img Loader