Viral video: दोन भावा भावांची, जावा जावांची भांडणं तुम्ही एकलीच असतील. माझा नवरा तुझा नवरा अशी सवती सवतींचीही भांडण तुम्ही पाहिली असतील, मात्र सध्या समोर आलेलं प्रकरण पाहून तुम्ही डोक्यालाच हात लावाल. बिहारमधील नालंदा जिल्ह्यातून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. धाकट्या दिरासोबत लग्न करण्यासाठी दोन जावांमध्ये बाचाबाची झाली. वाद इतका विकोपाला गेला,की दोघींनी एकमेकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नालंदा जिल्ह्यातील हिसला मलामा गावात राहणाऱ्या हरेंद्र पासवान या तरुणाच्या मोठ्या भावाचे काही दिवसांपूर्वी आजारपणाने निधन झाले होते. त्यामुळे हरेंद्रने आपल्या वहिनीसोबत लग्नगाठ बांधून त्याच्या मुलांचा सांभाळ करावा, अशी इच्छा नातेवाईकांची होती. या लग्नासाठी हरेंद्र तयारही झाला. मात्र, त्याचवेळी त्याच्या दुसऱ्या भावाच्या बायकोने मलाच हरेंद्रसोबत लग्न करायचं आहे, असा हट्टा धरला. या महिलेचा हरेंद्रच्या संपत्तीवर डोळा होता असा आरोप करण्यात आला आहे.

Rapper Raftaar is all set to tie the knot with fashion stylist Manraj Jawanda
रफ्तार दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार! घटस्फोटाच्या ५ वर्षांनी रॅपर चढणार बोहल्यावर, होणारी बायको कोण आहे? वाचा…
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Aai Aani Baba Retire Hot Aahet
Video : भर लग्नमंडपातून स्वीटीचा भाऊ तिला घेऊन जाणार? पाहा ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ मालिकेचा नवा प्रोमो
tejashree jadhav rohan singh wedding photos
मराठी अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, पती आहे बँकर; लग्नाचे फोटो पाहिलेत का?
Kanyadaan Fame Marathi Actor Wedding
‘कन्यादान’ फेम अभिनेत्याचा थाटामाटात पार पडला विवाहसोहळा! पत्नीचं सिनेविश्वाशी आहे खास कनेक्शन, पाहा फोटो
What is the meaning of chiranjiv and saubhagyakankshini
लग्नपत्रिकेत वराच्या नावापुढे ‘चिरंजीव’ आणि वधूच्या नावापुढे ‘सौभाग्यकांक्षिणी’ का लावले जाते?
tarkteerth lakshmanshastri joshi loksatta news
तर्कतीर्थ विचार : आंतरजातीय विवाह समर्थन
Gautam Adani on son Jeet Adani Diva Jaimin marriage
Gautam Adani Video : मुलाच्या लग्नात सेलिब्रिटिंचा महाकुंभ गोळा होणार का? गौतम अदाणीचं एका वाक्यात उत्तर, म्हणाले…

इतकंच नाही, तर दोन्ही महिलांकडील माहेरची माणसं देखील एकमेकांसोबत भिडली. भर रस्त्यात सुरू असलेला हा राडा इतका गंभीर होता, की यामध्ये पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> बापरे! मोबाईलसाठी ११ वर्षीय मुलीनं घर पेटवलं; आजी-आजोबांना कोंडलं अन्..धक्कादायक VIDEO व्हायरल

दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी करी हा वाद मिटवला. तरीही त्या दोघीही काही एकायला तयार नाही, अखेर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी लग्न झालेल्या पण संपतीवर डोळा असणाऱ्या एका महिलेला ताब्यात घेतलं आणि विधवा महिलेचं लग्न दिरासोबत लावून दिलं.

Story img Loader