प्रेम हे आंधळं असतं. ते कुणाचंही कुणाबरोबरही होऊ शकतं. प्रेमाखातर लोक वाट्टेल ते करतात, प्रेमात लोक आंधळे होतात. आपल्या प्रियकर वा प्रेयसीसाठी लोक काहीही करायला तयार असतात. प्रेमात वेगवेगळ्या शपथाही घेतल्या जातात; तर काही जण हे नातं लग्नापर्यंत घेऊन जातात. अशा अनेक घटना नेहमीच समोर येत असतात. त्याचप्रमाणे आतापर्यंत तु्म्ही अनेक लग्नं पाहिली असतील; मात्र सध्या एक असं प्रकरण समोर आलं आहे की, ज्यामध्ये दोन महिलांनी सात वर्षांच्या प्रेमानंतर अखेर लग्न केलंय. या लग्नाची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे.

बिहारमधील जमुई येथे राहणारी कोमल कुमारी नावाची एक मुलगी सात वर्षांपूर्वी एका महिलेच्या प्रेमात पडली. सात वर्षांपूर्वी एका चुकीच्या नंबरवर फोन केला आणि तिथून सुरू झालेला संवाद हळूहळू प्रेमात बदलला. सात वर्षांपासून एकमेकांना ओळखल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आणि २०२३ मध्ये घरच्यांना न सांगता, दोघी गुपचूप लग्न करण्यासाठी गेल्या. मात्र, दोघीही घरातून पळून जाण्याच्या बेतात असताना त्यांच्या कुटुंबीयांना याची माहिती मिळाली. तेव्हा त्यांचे हे नाते कुटुंबीयांनी मान्य केले नाही. त्यांनी त्यात हस्तक्षेप केला आणि दोन्ही महिलांना एकमेकांना भेटण्यास मनाई केली.

actor Imran Khan ex wife Avantika Malik comments on divorce
बालपणीचं प्रेम पण अवघ्या ८ वर्षांत मोडला संसार; बॉलीवूड अभिनेत्याची पत्नी घटस्फोटाबाबत म्हणाली, “जर मी…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Premachi Goshta Fame Rajas Sule went on trip to new zealand with wife after wedding 19 days
लग्नाच्या १९ दिवसांनंतर ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेता ‘या’ देशात गेला फिरायला, पत्नी फोटो शेअर करत म्हणाली…
six brothers marrying sisters in Pakistan
पाकिस्तानमध्ये सहा भावांचे सहा बहिणींशी लग्न, लहान भावाचे वय १८ वर्ष होण्यासाठी वर्षभर थांबले; या लग्नाची चर्चा का होतेय?
Groom dance with mother in his haldi on khandeshi song video goes viral on social media
“आये कर मन लगन” नवरदेवानं बायकोसोबत नाहीतर आईसोबत धरला खानदेशी ठेका; VIDEO झाला व्हायरल
Marathi Actress Hemal Ingle Wedding photo
साडेसात वर्षांच्या रिलेशनशिपनंतर हेमल इंगळेने बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ! पती आहे कलाविश्वापासून दूर…; फोटो आले समोर
Bride groom video husband picked up his wife while gruhpravesh after wedding newly weds couple video viral on social media
असा गृहप्रवेश प्रत्येक मुलीचा असावा! नवरदेवाने बायकोला चक्क उचलून घेतलं अन्…, लग्न करणाऱ्या मुलांनी ‘हा’ VIDEO एकदा बघाच
Image of Criminal
२१ वर्षांच्या तरुणावर जडला महिलेचा जीव, लग्नास नकार दिल्याने केले धारदार शस्त्रांनी वार

त्यामधली एक महिला कोमल कुमारी हिचा विवाह चार वर्षांपूर्वी झाला होता आणि तिला एक मुलगा आणि एक मुलगीही आहे. तर, दुसरी महिला सोनी कुमारी हिचे लग्न २००० मध्ये पाटणा येथील एका व्यक्तीशी झाले होते. कोमल आणि सोनी या दोघांनाही एकमेकांच्या विवाहाबद्दल माहीत होते; परंतु तरीही त्यांचे प्रेम प्रकरण सुरू होते. त्यानंतर त्यांनी घरातून पळून जाण्याचा बेत आखला. त्यांनी त्यांच्या मुलांसह त्यांचे कुटुंब सोडले. त्यांना त्यांचे आयुष्य नव्याने सुरू करायचे होते. यावेळी त्या पळून जाण्याच्या तयारीत असतानाच त्यांच्या नातेवाइकांनी त्यांना पकडले आणि या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही महिलांना पोलीस ठाण्यात आणले. पोलीस कोमल आणि सोनी यांची चौकशी करीत आहेत. दोन्ही महिलांनी सांगितले की, त्यांना एकमेकांसोबत आयुष्य घालवायचे आहे. त्यांनी अद्याप आपल्या जोडीदाराला घटस्फोट दिलेला नाही.

हेही वाचा >> चोरी करण्याची ‘ही’ पद्धत पाहा आणि सावध व्हा; अशी चोरी केली की VIDEO पाहून गोंधळून जाल

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, अशीच एक घटना बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातही घडली आहे. एका मामीचा आपल्या भाचीवर जीव जडला. त्यानंतर मामीने पतीला सोडून पळून जात भाचीबरोबर लग्न केले. त्यानंतर दोघींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या घरच्यांना लग्न केल्याची माहिती दिली. विशेष म्हणजे मामी आणि भाची यांच्यात तीन वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. त्यानंतर तिने कसलाही विचार न करता, त्यांनी दुर्गा भवानी मंदिरात लग्न केले.

Story img Loader