सोशल मीडियावर कपल्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक व्हिडीओमध्ये सार्वजनिक ठिकाणी कपल्सचा रोमान्सही पाहायला मिळतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण चालत्या स्कूटीवर किस करत आहे. विशेष म्हणजे या स्कूटीवर तिघे जण आहेत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
हा व्हायरल व्हिडीओ उत्तर प्रदेशच्या रामपूर येथील आहे. या व्हिडीओत चालत्या स्कूटीवर चक्क दोन तरुण एकमेकांना किस करताना दिसत आहेत तर तिसरा तरुण स्कूटी चालवत आहे. स्कूटीवरील दोन तरुणांचा रोमान्स पाहून नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हेही वाचा : Bye शब्दाचा अर्थ माहितीये का? कुणालाही बाय बोलण्याआधी फुल फॉर्म जाणून घ्या
नेटकरी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. एका युजरने लिहिले आहे, ” OMG तिन्ही मुले आहेत, या कलियुगात काय काय पाहावं लागत आहे?” हे दोन तरुण समलैंगिक असल्याचेही बोलले जात आहे.
या संपूर्ण प्रकरणावर रामपूर पोलिसांनी गाडीची नंबरप्लेट स्पष्ट दिसत नसल्याचे सांगत या मुलांचा शोध सुरू आहे, असे सांगितले. सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहन ओळखण्यात येईल आणि लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करू, असेही ते म्हणाले.