Bullet bike turns bicycle viral video: दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईच्या भडक्यामुळं सामान्य नागरिक होरपळून निघाले आहेत. दैनंदिन जीवनातील प्रवासात अविभाज्य घटक असणारी वाहने पेट्रोलशिवाय चालत नाहीत. अशातच पेट्रोलचे भाव गगनाला भिडले असल्याने वाहनचालकांच्या नाकीनऊ आले आहेत. सर्व बाजूंनी महागाई वाढत असल्यानं संसाराचा गाडा हाकण्यात सामान्य माणसाची पुरती दमछाक झालीय. अशाच प्रकारचा एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका तरुणाने चक्क बुलेटलाच सायकल बनवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एक तरुणी त्याच्या मित्राला बुलेट सायकलवर घेऊन मस्त सवारी करताना व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसत आहे.

व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी म्हणाले, पेट्रोलचे भाव वाढले अन् परिस्थिती बदलली

दोन मुलं रस्त्यावरून बुलेट-सायकलची सवारी करताना व्हिडीओत दिसत आहेत. व्हिडीओच्या सुरुवातीला असं वाटतं की, हा तरुण रस्त्यावरून बुलेटनेच प्रवास करत आहे. पण त्या तरुणाची बुलेट सवारी कॅमेराच्या जवळ आल्यावर कळंत, की बुलेट नव्हे, ही तर पायंडल मारणारी सायकल. हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला लाखोंच्या संख्येत व्यूज मिळाले असून नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका नेटकऱ्याने भन्नाट प्रतिक्रिया देत म्हटलंय, “पेट्रोल महाग झाल्यामुळं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.” तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटलं, “खूपच टॅलेंटेड देश आहे आपला. प्रत्येक ठिकाणी टॅलेंटेड माणसं मिळत राहतात.”

Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Groom dance for bride on hoshil ka ya pathyachi sobar gharwali marathi song video goes viral on social media
VIDEO: “बायको पाहिजे नखरेवाली” मराठमोळ्या गाण्यावर नवरदेवाचा भन्नाट डान्स; काय ते प्रेम, काय तो डान्स…आहाहा!
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच
Viral video of a fight between some local train passengers on a kandivali railway station is currently going viral on social media
कहरच! तरुणांनी मुंबईतील कांदिवली रेल्वे स्टेशनवर हद्दच पार केली; VIDEO पाहून तुम्हीच सांगा हे कितपत योग्य?

नक्की वाचा – Video: भर लग्नमंडपात भरली व्यायामशाळा, नवरीला पुल-अप्स मारताना पाहून वऱ्हाडी चक्रावले, नवऱ्याने केलं असं काही…

इथे पाहा व्हिडीओ

@prince_raj9927 नावाच्या युजरने अशाच प्रकारचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर काही दिवसांपूर्वी शेअर केला होता . तो व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या होत्या. तो व्हिडीओही सोशल मीडियावर जबरदस्त गाजला होता. कारण ९ लाखांहून अधिक लाईक्स त्या व्हिडीओला मिळाले होते. सोशल मीडियावर काही ना काही जुगाड करुन वाहने बनवण्याचे व्हिडीओ व्हायरल झालेले आपण पाहिले असतील. पण अशाप्रकारचा व्हिडीओ याआधी तुम्ही कदाचित पाहिला नसेल. कारण पेट्रोलचे वाढणारे दर पाहता लोकांच्या डोक्यात पैसे वाचवण्यासाठी भन्नाट कल्पना येतात. आणि एका व्यक्तीने बुलेटलाच सायकल बनवण्याचा जुगाड व्हिडीओत पाहिल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Story img Loader