आजकाल घराच्या परिसरातील, गार्डनमधील तर कधी रस्त्याचे सुशोभीकरण करण्यासाठी लावण्यात आलेल्या काही वस्तूंची चोरी केल्याच्या अनेक घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकतेच काही दिवसांपुर्वी एका आलिशान कारमधून दोन माणसांनी सरकारी फुलांची झाडे चोरली होती. या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यामुळे आता कोणतीच गोष्ट सुरक्षित नसल्यातं नागरिकांकडून म्हटलं जात आहे.
अशातच आता आणखी असाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील मुलांनी अशा वस्तूची चोरी केली आहे.ती पाहून अनेकांना आपलं हसू आवरणं कठीण झालं आहे. शिवाय या मुलांनी ती वस्तू कशासाठी चोरली त्यांच्यावर इतके वाईट दिवस आलेत का? असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत. तर या मुलांनी नक्की कोणती वस्तू चोरली आहे ज्यामुळे ते व्हायरल होत आहेत ते पाहूया.
हेही पाहा- लहान भावाच्या वाढदिवसानिमित्त त्याने भाकरीवर लावली मेणबत्ती, भावनिक Video पाहूण डोळ्यात येईल पाणी
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन तरुण मुलं स्कूटीवरुन येतात आणि एका इमारतीच्या समोर उभं राहतात. त्यानंतर एक मुलगा खाली उतरतो आणि गेटच्या आत जातो आणि काही हातवारे करतो. त्यानंतर त्याचा मित्र स्कूटी घेऊन भितींशेजारी उभा राहतो. काही वेळाने एकजण खाली वाकून चक्क गटाराचे झाकण उचलतो आणि आपल्या स्कूटीवर ठेवतो आणि दोघे स्कूटी घेऊन पळ काढतात. त्यांच्या या चोरीची घटना इमारतीसमोर लावलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
हेही पाहा- चक्क कोळ्याने केली सापाची शिकार, जाळ्यातून स्वत:ची सुटका करण्यासाठी तडफडणाऱ्या सापाचा Video व्हायरल
नेटकरी म्हणाले भुरटे चोर –
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर हे तरुण गटाराचे झाकण चोरण्यासाठी आले आहेत असं सुरुवातीला कोणालच वाटत नाही. पण त्यांनी ते चोरल्यामुळे सोशल मीडियावर त्यांना चांगलच ट्रोल केलं जात आहे. शिवाय हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचे चांगलच मनोरंजन होत आहे. गटाराच्या झाकण चोरीचा व्हिडिओ indian.official.memes नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने आता गटाराची झाकणालाही लॉक लावायला पाहिजे असं म्हटलं आहे. तर आणखी एकाने, भाऊ, हा भयंकर कलयुग आहे, अशी कमेंट केली आहे. तर अनेक नेटकऱ्याने चोर नव्हे चींधीचोर असल्याचंही म्हटलं आहे.