Children’s Fighting Shankarpalya Funny Video : लहान मुलांची भांडणं फार मजेशीर असतात. ती भांडणातही इतक्या निरागसपणे आपली बाजू मांडत असतात की, ते पाहून आपल्यालाच हसायला येतं. यात भांडणाचे विषयदेखील क्षुल्लक पण ही मुले त्यावरही इतक्या गंभीरपणाने भांडतात ना की, त्यांचे ते भांडण मजेशीर वाटू लागते. तीन वर्षांपूर्वी अशाच दोन लहान मुलांच्या भांडणाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ दिवाळीनिमित्त पुन्हा एकदा व्हायरल होतोय. दिवाळीनिमित्तच का, तर त्यामागेही मजेशीर कारण आहे आणि ते म्हणजे भांडणात एक चिमुकला शिवी म्हणून दुसऱ्या मुलाला रागात सतत दिवाळीत आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ शंकरपाळ्या, असं मोठमोठ्यानं चिडून बोलत होता. त्यामुळे अनेकांनी हा व्हिडीओ #शंकरपाळ्या हॅशटॅग वापरून तुफान शेअर केला. तुम्ही हा व्हिडीओ आजही बघाल, तर पोट धरून हसल्याशिवाय राहणार नाहीत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेकांना हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांच्या बालपणीचे दिवस आठवतील, कारण तुमचंही लहानपणी असं कुणाबरोबर तरी भांडण झालंच असणार. हा व्हिडिओ बीड जिल्ह्यातील शिरसाळा या ठिकाणचा होता.

तुम्हालाही दिवाळीत हा व्हिडीओ आठवल्याशिवाय राहणार नाही

व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, दोन लहान मुलं खेळता खेळता एकमेकांशी अचानक भांडू लागतात. एकमेकांना मारण्याची धमकी देतात. यावेळी एक मुलगा दुसऱ्याला एऽऽ शंकरपाळ्या! म्हणत सतत हिणवतो. त्यावर दुसरा एका चापटीत खाली पाडीन; दुसरी लागू बी देणार नाही, असं म्हणतो. दोघं अगदी गंभीरपणे भांडत होते. पण, भांडताना त्यांचे डायलॉग्ज ऐकून अनेकांना हसू आवरणे कठीण झाले.

“तुम्ही भारतात निघून जा, काळे…”, कॅनडात भारतीयाबरोबर गैरवर्तन; धक्कादायक VIDEO व्हायरल

ही दोन्ही मुलं वयानं लहान आहेत; पण त्यांची भांडणाची स्टाईल मात्र मोठ्या मुलांसारखी आहे, त्यामुळे त्यांची हीच स्टाईल अनेकांना चांगलीच भावली होती. दोघांनी एकमेकांना हात न लावता डायलॉगबाजीतून भांडण केलं. विशेषत: त्या मुलाचा एऽऽ शंकरपाळ्या! हा शब्द तर अनेकांनी डोक्यावर घेतला; ज्यावर अनेक मीम्स, फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two childrens fighting old video viral during diwali 2024 shankarpalya funny video on social media sjr