Cobra Snake Romantic Video : साप समोर दिसला की भल्या भल्यांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. अशातच तो साप जर विषारी असेल तर सर्वांची पळता भूईच होते. नागासारखा विषारी साप जेव्हा मानवी वस्तीत प्रवेश करतो, तेव्हा त्याच्यापासून चार हात लांब राहून आपा जीव वाचवणं हेच योग्य ठरतं. अशीच एक घटना एका व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आली आहे. रस्त्यावरून सरपटणारी नाग-नागीन चक्क एका सायकलच्या कॅरेलवर जाऊन बसते. सायकलच्या दिशेनं नाग आल्याचे पाहून सायकलस्वारानी नक्कीच धूम ठोकली असणार, कारण सायकलवर फक्त नाग-नागिन फणा काढताना या व्हिडीओत दिसत आहे. हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरी यावर भन्नाट प्रतिक्रियाचं वर्षावर करत आहे.

नागाने फणा काढल्यानंतर नेमकं काय घडलं? पाहा थरारक व्हिडीओ

किंग कोब्राचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. पण या नाग-नागिनच्या प्रेमाचा व्हिडीओ क्वचितच व्हायरल झालेला आपण पाहतो. एका सायकलच्या कॅरेवर नाग-नागिन रोमान्स करताना या व्हिडीओत दिसत आहेत. त्यांच्या रोमॅंटिक अदा पाहून नेटकरीही घ्यायाळ झाले आहेत. सायकलच्या कॅरेवर नागाने मोठा फणा काढल्यावर सायकलस्वाराने नक्कीच पळ काढला असेल, असां अंदाज नेटकऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे. -goga-ni-daya नावाच्या युजरने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओता आतापर्यंत १३ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. तसेच या व्हिडीओला लाखो व्यूजही मिळाले आहेत.

Viral Video Shows lion gripping a mans limbs
‘हे तुमच्या कर्माचे फळ…’ पिंजऱ्यातील पाळीव सिंहाने माणसावर केला हल्ला अन्… VIRAL VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Shocking video Angry Hippopotamus Attacks Tourists At A Jungle Safari Animal Video Viral
सिंह-वाघापेक्षाही खतरनाक पाणघोड्याच्या नादाला लागले; जवळ जाताच केला खतरनाक हल्ला, VIDEO चा शेवट पाहून थरकाप उडेल
Tiger enters toilet window viral video on social media
बापरे! शौचालयाच्या खिडकीत शिरला वाघ, मान बाहेर काढली अन्…, VIDEO मध्ये पाहा पुढे काय झालं…
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
three cheetahs attack the fox
‘तिघांच्या तावडीतून तो सटकला…’, तीन चित्त्यांचा कोल्ह्यावर हल्ला; थरारक VIDEO पाहून व्हाल शॉक
Bull attacked a person while he was dancing in front of him viral video on social media
बैलाशी मस्ती आली अंगाशी! माणसाच्या ‘या’ कृत्यामुळे बैल पिसाळला, शिंगाने उडवलं अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं?
Leopard attacks Viral Video
‘त्याने लढून स्वतःचा जीव वाचवला…’ घराबाहेरच्या अंगणात बिबट्याने थेट श्वानावर केला हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप

इथे पाहा व्हिडीओ

नक्की वाचा – Video: भारतात येऊन रस्त्यावरील फळविक्रेत्यांना शिवीगाळ केली, जर्मन इन्फ्लूएन्सरला नेटकऱ्यांनी झापलं, म्हणाले, “याला थांबवलं पाहिजे”

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, ” या नाग-नागिनची मागच्या जन्माची सायकल चालवण्याची इच्छा अपूरी राहिली असेल.” सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्साठी पाळीव प्राणी, साप यांच्यासोबत खेळ करून ते व्हिडीओ व्हायरल करण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहे. दररोज अनेक प्रकारचे थरारक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत असतात. स्वत:च्या आणि लोकांच्या मनोरंजनासाठी काही जण विनाशकाले विपरीत बुद्धीचा वापर करतात. अशाच प्रकारचा एक धक्कादायक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. एका पठ्ठ्यानं चक्क जीवंत नागावर बंदुकीची गोळी झाडली. पण त्याच्या निशाणा चुकल्यावर नाग थेट त्यांच्यावर अंगावर धावला. ही थरारक दृष्ये कॅमेरात कैद झाली होती. नागाने या तरुणाला शिक्षा देण्यासाठी ठाम निर्धारच केलं होतं,अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्हिडीओला दिल्या होत्या.

Story img Loader