Two Dog Viral Video: आपल्याला दोन वेळचं अन्न मिळावं यासाठी लोक दिवस-रात्र कष्ट करतात; तर जंगलातील प्राणी शिकार करून आपली भूक भागवतात. परंतु, भटक्या कुत्र्यांना दारोदारी फिरून आपलं पोट भरावं लागतं. रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्या व्यक्तीला त्यांची दया आली की, तो त्यांना काहीतरी खाऊ घालतो. पण, असा दिवस दररोज त्यांच्या नशिबात येत नाही. बऱ्याचदा लोकांच्या घराबाहेर तासन् तास बसल्यानंतर त्यांना एखादा तुकडा खायला मिळतो. आता व्हायरल होत असलेल्या फोटोतही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.
खरं तर, श्वान अनेकांचा आवडता प्राणी आहे. या पाळीव प्राण्यावर लोकांचे जीवापाड प्रेम असते. श्वानाला घरातील सदस्याएवढीच उत्तम वागणूक दिली जाते. त्याशिवाय त्याची आवड-निवडही पूर्ण केली जाते. अलीकडे अनेक जण श्वानाचा वाढदिवसदेखील आवडीने साजरा करतात, त्याला फिरायला घेऊन जातात. अशा अनेक कौतुक सोहळ्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात; पण सर्व माणसांचे नशीब सारखे नसते. त्याचप्रमाणे सर्व प्राण्यांचे नशीबही सारखे नसते. काहींना श्रीमंत घरात आश्रय मिळतो; तर अनेकांना लोकांचं खरकटं खाऊन जगावं लागतं. आता व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्येही असंच काहीतरी पाहायला मिळतंय.
या व्हायरल फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, रात्रीच्या वेळी एका घराबाहेर दोन श्वान उभे राहिले असून, यावेळी ते दोघेही घरातील मालक दरवाजा उघडून आपल्याला काहीतरी खायला देईल या आशेने दाराकडे तोंड करून बसलेले दिसत आहेत. या व्हायरल फोटोला ‘रात्रभर जागून पाहिलंय… एका भाकरीसाठी रात्र खूप मोठी वाटते’, अशी कॅप्शन देण्यात आली आहे.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @anjali_animal_lover या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत दोन लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. त्याशिवाय अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय, “ज्या घरासमोर आहेत, त्यांना काहीतरी खायला द्या.” आणखी एका युजरनं लिहिलंय, “वाईट वाटतं असं पाहून.” तर आणखी एकानं लिहिलंय, “माझी बायको दररोज अशा श्वानांना खाऊ घालते.” अनेक जण या व्हिडीओवर हसताना दिसत आहेत.