Viral Video: उंच इमारती, टॉवरमध्ये रहिवाशांना स्वत:साठी, तसेच सामानाची चढ-उतार करण्यासाठी लिफ्ट या उपकरणाचा उपयोग केला जातो. आजकाल सर्व हाऊसिंग सोसायटीज, कॉर्पोरेट ऑफिसेस, औद्योगिक क्षेत्र, शॉपिंग मॉल्स इत्यादींमध्ये लिफ्टस्चा सर्रास वापर होत आहे. पण, अनेकदा लिफ्टमध्ये चढल्यावर ती मधेच बंद तर पडणार नाही ना ? याची भीती आपल्यातील प्रत्येकाच्या मनात असते. आज सोशल मीडियावर याचसंबंधित एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. दोन घरगुती मदतनीस महिला लिफ्टमध्ये गेल्या आणि ती लिफ्ट मधेच बंद पडली. त्या महिलांनी इमर्जन्सी बटण दाबले; मात्र त्यांच्या मदतीला एक तास कोणीच आले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बंद लिफ्टचा हा व्हायरल व्हिडीओ नोएडा जेपी विशटाउन सोसायटी येथील आहे. तर ही घटना अशी आहे की, नोएडा सोसायटी सेक्टर १३४ मध्ये लिफ्टमध्ये दोन घरगुती मदतनीस महिला जवळपास एक तास अडकल्या होत्या. त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली, अलार्म बटण दाबले, इमर्जन्सी नंबरवर अनेक कॉल केले. पण, त्यांचे कॉल किंवा त्यांचा आरडाओरडा कोणालाही ऐकू गेला नाही. पण, एक तासानंतर लिफ्ट बंद पडल्यामुळे सुरक्षा आणि देखभाल कर्मचारी लिफ्टजवळ गेले. त्यांनी कशा प्रकारे या दोन्ही महिलांना बाहेर काढले ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

हेही वाचा…रीलचा मोह अंगलट! शाळकरी विद्यार्थिनींचा भररस्त्यात विचित्र स्टंट; खांद्यावर चढली, बॅकफ्लिप मारायला गेली अन्…; VIDEO व्हायरल

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, सोसायटीच्या लिफ्टमध्ये दोन घरगुती मदतनीस महिला अडकलेल्या असतात. जवळजवळ एक तासाने दोन सुरक्षा रक्षक लिफ्टजवळ पोहोचतात आणि एका कामगाराच्या मदतीने लिफ्टचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करताना दिसतात. बराच वेळ प्रयत्न करून अखेर त्यांना सुखरूपपणे लिफ्टबाहेर काढण्यात आले आहे. अहवालानुसार या लिफ्टची योग्यरीत्या देखभाल होत नाही. याआधीही सोसायटीतील रहिवाशांनी याबाबत तक्रार केली होती. पण, कोणीच लक्ष न दिले नाही. परिणामस्वरूप ही घटना घडली.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @noida_greaternoida_residents ग्रेटर नोएडा रेसिडेंट्स यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच कॅप्शनमधून या घटनेची थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. लिफ्टच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याने रहिवासी आणि पाहुण्यांना ही बिघडलेली लिफ्ट नेहमीच त्रासदायक ठरतेय. कारण- मधेच लिफ्ट अडकली, तर हवाबंद लिफ्टमध्ये अडकून एखाद्याला चक्कर येऊ शकते किंवा आणखीही काही त्रास होऊ शकतो; जसे आज या व्हायरल व्हिडीओत पाहायला मिळाले.