Viral Video : सोशल मीडियावर फ्रेंडशिप डेनिमित्त अनेक व्हिडीओ, मीम्स व्हायरल होत आहेत. अशात दोन मद्यपी मित्रांचाही एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आलेला आहे. या व्हिडीओमध्ये दोन दारूडे मित्र चप्पल घालण्यासाठी तारेवरची कसरत करताना दिसत आहेत.
मैत्री हे असं नातं असतं जे नेहमी आपल्या मित्राच्या मदतीला धावून येतं. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, मद्यपी मित्राच्या मदतीलाही एक मित्र धावून आला. गंमत म्हणजे मदत करणाऱ्या मित्रानेसुद्धा मद्यपान केले आहे.

हेही वाचा : Video : चप्पल घालण्यासाठी मद्यपीची केवढी ती कसरत! व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, मद्यपान केलेल्या एका मित्राला चप्पल घालता येत नाही तेव्हा दुसरा मद्यपी मित्र त्याला चप्पल घालायला मदत करीत आहे. विशेष म्हणजे चप्पल घालण्याचा प्रयत्न करताना दोघांचाही तोल जाताना दिसत आहे. मदत करणाऱ्या मद्यपीच्या हातात भाजीची पिशवीसुद्धा आहे. या व्हिडीओवर “ये दोस्ती हम नही तोडेंगे, तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे” हे गाणे लावले आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना हसू आवरणार नाही.

हेही वाचा : धो धो पावसात भर रस्त्यावर निवांत गप्पा मारत बसल्यात या महिला, नेटकरी म्हणतात, “कोणत्या विषयावर चर्चा करताहेत?”

ankya_tadake__77 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “जिगरी यार”. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हे दोघेही खरे मित्र आहेत; एकमेकांची साथ सोडणार नाहीत.” तर एका युजरने लिहिलेय, “आयुष्य खूप लहान आहे. त्यामुळे प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यावा.” आणखी एका युजरने लिहिले, “जिगरी यार” या व्हिडीओवर काही युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत; तर काही युजर्सनी त्यांच्या मित्रांना टॅग केले आहे.

Story img Loader