उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील ग्रेटर नोएडा येथील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका सोसायटीत दोन तरुण दारूच्या नशेत बाल्कनीमध्ये उतरल्याचं दिसत आहे. शिवाय दारूच्या नशेत हे दोन्ही तरुण पाचव्या मजल्यावरील बाल्कनीत लटकत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. सुदैवाची बाब म्हणजे या घटनेत कोणतीही दुर्घटना झाली नसून दोन्ही तरुण सुखरुप आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दारुच्या नशेत बाल्कनीमध्ये गेलेल्या तरुणांना काही लोकांनीवाचवण्याचा प्रयत्नही केला, मात्र त्यांनी वाचवणाऱ्या लोकांनाच शिवीगाळ केली आहे. ही सर्व घटना मोबाईलच्या कॅमेऱ्यात शूट झाली आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण ग्रेटर नोएडा वेस्टच्या सुपरटेक इको व्हिलेज-३ सोसायटीशी संबंधित आहे. येथील दोन तरुण दारू पिऊन बाल्कनीच्या शेजारी असलेल्या स्लॅबवर बसून काही तरी बोलत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर हे दोन तरुण जीव धोक्यात घालून बाल्कनीत आरडाओरडा करत शिवीगाळ करत असल्याचंही सांगितलं जात आहे.

हेही पाहा- “कोई तो मेरा भी सचिन होगा” विराटची पाकिस्तानी फॅन भारतीय तरुणांवर नाराज, VIDEO शेअर करत व्यक्त केली खंत, म्हणाली…

दारुड्यांनी वाचवणाऱ्यांनाच केली शिवीगाळ

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दारु पिलेल्या दोघांना वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, यावेळी बाल्कनीत अडकलेल्या आणि दारुच्या नशेत असलेल्या तरुणांनी वाचवणाऱ्या व्यक्तीलाच शिवीगाळ करायला सुरुवात दिसत आहे. अखेर या तरुणांना तेथून बाहेर काढण्यात आल्याने दुर्घटना टळली. दरम्यान, याच सोसायटीत राहणाऱ्या एका तरुणाने सांगितले की, अशा गोष्टी करणं योग्य नाही कारण इथे अनेक कुटुंब आणि लहान मुले राहतात.