अमेरिकेतल्या केंटुकीमधील एका शेतात दोन तोंड असलेल्या वासराचा जन्म झाला आहे. परस्पर विरुद्ध दिशेला ही दोन तोंडे आहेत. दोन नाक असलेल्या या वारसाचे डोळे मात्र एकमेकांना जोडले आहेत. सुरुवातील गायीने जुळ्या वासरांना जन्म दिल्याचे या गायीच्या मालकास वाटले पण नंतर मात्र एकाच वासराला दोन तोंड असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ही बातमी आजूबाजूला पसरताच सगळ्यांनी या वासराला पाहण्यासाठी गर्दी केली. गेल्याच आठवड्यात या वासराचा जन्म झाला. या वासराला नीट चालता येत नसून ते स्वत: भोवती घिरट्या घेत जमीनीवर कोसळते अशी माहिती येथल्या मालकाने दिली आहे. अशा प्रकारे जन्माला आलेले प्राणी हे अशक्त असतात किंवा जास्त काळ जगत नाही अशी माहिती या कुटुंबाने दिली. परंतु गायीचे हे वासरु आपल्या दोन्ही तोंडांनी अन्न खात असून तब्येतीने देखील ते सदृढ असल्याचे या कुटुंबाने सांगितले. या पिल्लाचे जगणे हे दैवी चत्मकार असल्याचे या कुटुंबाचे म्हणणे आहे म्हणूनच त्यांनी या वासराचे नाव ‘लकी’ ठेवले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा