Viral Video : सध्या सोशल मीडियावर झांसीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन महिला पोलीस कर्मचारी भाजी विक्रेता महिलेला मारहाण करताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर महिला पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे ही घटना पोलीस स्टेशन समोर घडली आहे.
व्हायरल होतोय व्हिडीओ
शुभम सिंग यांनी एक्सवर हा व्हिडीओ शेअर केला असून त्यांनी व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “झांसीमध्ये भ्रष्टाचारविरोधी पोलीस स्टेशनसमोर भांडणाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. येथे रस्त्यावर सुरक्षा कर्मचारी महिला भाजी विक्री करणाऱ्या महिलेला मारहाण करताना दिसत आहे. या वेळी एका नागरिकाने ही घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड करून व्हिडीओ व्हायरल केला आहे.” पुढे झांसी पोलिसांना टॅग सुद्धा केले आहे.
पाहा व्हिडीओ
महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी भाजी विक्रेत्या महिलेला केली मारहाण
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका भाजी विक्री करणाऱ्या महिलेला एक पोलीस कर्मचारी महिला पकडून आहे तर दुसरी तिला मारहाण करताना दिसत आहे. व्हिडीओ तुम्हाला दिसेल की पोलीस कर्मचारी महिला प्लास्टिकच्या क्रेटनी या महिलेल्या डोक्यावर मारताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. यावेळी एक पोलीस कर्मचारी मध्यस्थी करतो आणि त्या दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांना थांबवतो आणि मारहाण न करण्याचा सल्ला देतो. तरीसुद्धा भाजी विक्रेता महिला आणि महिला पोलीस कर्मचारी भांडताना दिसतात. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हेही वाचा : बापरे! मांसाहारी पदार्थ बनवण्याची ‘ही’ कोणती पद्धत? महिला कामगाराने हातात घेतला मॉप अन्… पाहा व्हायरल VIDEO
हा व्हिडीओ पाहून अनेक युजर्सनी संताप व्यक्त केला आहे. काही युजर्सनी या महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा मागणी केली आहे. एका युजरने लिहिलेय, ” भाजी विक्रेत्याबरोबर असे वागणे योग्य आहे का? सरकारचा पैसा लुटणाऱ्या आमदार खासदारांना तुम्ही लोक अशी वागणूक का देत नाही? या वर तुम्ही काय कारवाई करणार आहात?” तर एका युजरने लिहिलेय, “कोणतीही महिला तिचे छंद जोपासण्यासाठी घराबाहेर पडत नाही. मुलांचे आणि कुटुंबाचे पोट भरण्यासाठी ती घराबाहेर पडते. बाहेर काम केल्यानंतर ती घरी स्वयंपाक करते. तिच्याशी अशीप्रकारे गैरवर्तन करणे चांगले नाही. अशा गरीब महिला ज्या प्रामाणिकपणे काम करतात, त्यांच्याबरोबर या पोलीस कर्मचारी असे का वागतात?” आणखी एका युजरने लिहिलेय, “झांशी पोलिसांकडून अपेक्षा आहे की ते या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करतील आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करतील”