आतापर्यंत मुलींसाठी मुलांमध्ये झालेल्या भांडणाचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण आता यात मुली सुद्धा काही कमी नाहीत. याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. मुलांचे असो किंवा मुलींचे असो…. हाणामारीचे व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. चक्क एका बॉयफ्रेंडसाठी दोन मुलींचा गट आपापसात भिडल्याचं पहायला मिळालं. यात दोघींनी एकमेकींना लाठीने सुद्धा मारहाण केली आहे. या भांडणात मुली इतक्या आक्रमक होतात की एकमेकींच्या पार झिंज्या उपटून जमिनीवर आपटून फ्री स्टाईल मारहाण केलीय. हे वाचून तुमचा कदाचित यावर विश्वास बसणार नाही. पण हे दृश्य पाहून पोलीस सुद्धा चक्रावून गेले आहेत.

समोर आलेला व्हिडीओ हा दिल्लीतला असून एका कॉलेजबाहेर या मुलींमध्ये ही हाणामारी सुरु आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दोन तरुणींमध्ये जोरदार भांडण सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. या मुली एकमेकींचे केस ओढत आहे, तर दुसरी लाथा घालतेय. तर कुणी तिला खाली पाडण्याचा प्रयत्न सुद्धा करतांना दिसून येतंय. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही लोकांनी या भांडणाचा व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला.

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> रात्रीच्या अंधारात घरात शिरला बिबट्या अन्…; तामिळनाडूतील धडकी भरवणारा VIDEO आला समोर

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

Story img Loader