आपल्या देशात गुणवत्तेची अजिबात कमी नाही. पण योग्य ती संधी आणि व्यासपीठ उपलब्ध नसल्याने अशा लोकांना कधीच प्रसिद्धी मिळत नाही. मात्र, हल्लीच्या तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मीडियाचा प्रभाव आणि व्याप्ती वाढल्यामुळे सामान्यांसाठी मोठं व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. एखाद्या व्यक्तीचे कलागुण आवडले की त्या व्यक्तीला सोशल मीडियावर अक्षरश: डोक्यावर उचलून धरलं जातं. अशी कितीतरी उदाहरणं आहेत ज्यांनी आपल्या कलागुणांनी कोट्यवधी लोकांची मनं जिंकून घेतली आणि सोशल मीडियासारख्या मोठ्या व्यासपीठामुळे त्यांना रातोरात प्रसिद्धी मिळाली. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूपच गाजतोय.
Viral Video : वधू-वराच्या भन्नाट ‘वेडिंग डान्स’चा सोशल मीडियावर धुमाकूळ
राहत फतेह अली खान यांनी गायलेल्या ‘मेरे रश्के कमर’ गाण्यावर दोन तरुणींनी आपल्या दिलखेचक अदांनी दमदार नृत्य सादर केलं आहे. ‘कांची शाह’ या यूट्युब अकाऊंटवरुन शेअर केलेल्या या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. आपल्या नृत्यशैलीनं लोकांची मनं जिंकणाऱ्या तरूणींची नावं कांची शाह आणि सना पिंडारे असल्याचं समजतं आहे. या दोघीही उत्तम बेली डान्सर आहेत आणि उत्तम नृत्यदिग्दर्शकही. कांची आणि सनाचा व्हिडिओ २१ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.