Bike Stunt Viral Video: वाहतुकीचे नियम मोडून रस्त्यावर वाहनांची भन्नाट स्टंटबाजी करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. पण व्हिडीओच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्यासाठी धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्यांना चांगलीच अद्दलही घडल्याचे व्हिडीओ अनेकदा समोर आले आहेत. रस्त्यावरून जाताना विनाशकाले विपरीत बुद्धी सुचल्यावर वाहन चालक काय करतील, याचा नेम नाही. असाच एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. एक तरुणी बाईकवर सवारी करत असते. तिच्यासोबत दुसरी एक मुलगी पाठीमागच्या सीटवर बसलेली असते. पण बाईकवर खतरनाक स्टंटबाजी मारण्याच्या प्रयत्नात दोघीही जमिनीवर दणकण आपटतात. हा थरारक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला असून नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.
व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “पापा की परी हवा में उडी”
दोन मुली बाईकवर बसलेल्या या व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता. बाईक चालवणारी मुलगी अचानक वेग वाढवते आणि बाईकवर स्टंट मारण्याचा प्रयत्न करते. पंरतु, वेगावर नियंत्रण ठेवता न आल्याने या तरुणीचा तोल जातो आणि बाईकवरून दोघीही जमिनीवर पडतात. खतरनाक स्टंटबाजी करणं या दोन तरुणींच्या चांगलच अंगटल आल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. काही जण सोशल मीडियावर प्रकाशझोतात येण्यासाठी भन्नाट स्टंटबाजी करण्याच्या उत्साहात स्वत:चा जीव धोक्यात टाकतात. या तरुणींनीही धोका पत्करून स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.
इथे पाहा व्हिडीओ
तरुणींनी बाईकवर स्टंटबाजी केलेला हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. हा व्हिडीओ Ravi Kumar नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओला आतापर्यंत ३ लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तर हजारो नेटकऱ्यांनी या व्हिडीओला लाईकही केलं आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एक नेटकरी प्रतिक्रिया देत म्हणाला, “पापा की परी कुणापेक्षाही कमी नाहीय.” दुसऱ्या नेटकऱ्यानं म्हटलं, “आम्ही तर कधीच अशी सवारी करु शकत नाही.” बाईकवर स्टंटबाजी करून हिरोगीरी करण्याचं फॅड दिवसेंदिवस वाढत असल्याचं व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंच्या माध्यमातून समोर आलं आहे.