Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. कधी हटके डान्सचे व्हिडीओ व्हायरल होतात तर कधी गाण्याचे व्हिडीओ व्हायरल होतात. कधी भन्नाट जुगाडचे व्हिडीओ व्हायरल होतात तर कधी भयानक स्टंटचे व्हिडीओ सुद्धा चर्चेत येतात. अनेकदा सार्वजानिक ठिकाणी लोक भांडतात, त्या भांडणाचे सुद्धा व्हिडीओ चर्चेत येतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका कार्यक्रमात भर गर्दीमध्ये दोन तरुणी भांडण करताना दिसत आहे. हे भांडण इतक्या विकोपाला जाते की त्या एकमेकांना मारहाण करताना दिसतात. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (shocking Viral Video: Two girls fighting in Crowd during some Fest and pull hairs of each other)
हा व्हायरल व्हिडीओ एका सार्वजानिक कार्यक्रमातील आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला लोकांची प्रचंड गर्दी दिसून येईल. पण दोन तरुणींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या दोन तरुणी एकमेकींसमोर उभ्या आहेत आणि भांडताना दिसत आहे. त्या एकमेकींना धक्काबुक्की, मारहाण करताना दिसत आहे. एवढंच काय तर एकमेकींचे केस सुद्धा ओढताना दिसत आहे. या दोन तरुणींचे भांडण पाहून अनेक लोक जमा झालेले दिसतात त्यानंतर पुढे व्हिडीओत काही लोक येतात आणि मध्यस्थी करत त्यांना एकमेकांपासून दूर करण्याचा प्रयत्न करतात. ही घटना नेमकी कुठली आहे, याविषयी अद्याप माहिती नाही आणि हे भांडण नेमके कशावरून झाले, याविषयी सुद्धा माहिती समोर आलेली नाही.
पाहा व्हायरल व्हिडीओ
Ghar Ke Kalesh या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “दोन तरुणी भांडताना दिसत आहे”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “या मुली का भांडत आहे?” तर एका युजरने लिहिलेय, “हल्ली मुली खूप भांडतात” आणखी एका युजरने लिहिलेय, “मला असं वाटते की या तरुणी मुलासाठी भांडत आहे.” अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी सुद्धा शेअर केले आहेत.