Two Girls Sing National Anthem With Holding Cigarette: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन तरुणी हातात सिगारेट घेऊन विचित्र आवाजात भारताचं राष्ट्रगीत गात आहेत. संबंधित तरुणींनी हा व्हिडीओ आपल्या फेसबूक खात्यावरून शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर झाल्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. ही घटना पश्चिम बंगालमधील आहे.

संबंधित व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, या तरुणी हातात सिगारेट घेऊन चुकीच्या शब्दांत राष्ट्रगीत गात आहेत. त्यांनी फेसबूक तसेच इतर सोशल मीडिया अकाऊंटवरून हा प्रकार लाइव्ह केला होता. गंमतीचा भाग म्हणून आम्ही हा व्हिडीओ बनवला आहे, असं संबंधित तरुणींनी म्हटलं आहे. याप्रकरणी पश्चिम बंगालमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हातात सिगारेट घेऊन तरुणींनी गायलं राष्ट्रगीत (VIRAL VIDEO)

भाजपाचे स्थानिक नेते अनुपम भट्टाचार्य यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. संबंधित तरुणींनी जाहीर माफी मागावी, अशी संतप्त मागणी नेटकऱ्यांनी केली.

Story img Loader