Viral Video Today: वॉटरपार्क किंवा ऍडव्हेंचर पार्कमध्ये मजामस्ती करायला जावं तर रांगांमध्येच उभं राहण्यात जास्त वेळ जातो. थेट रांग मोडून पुढे जावं आणि चटकन त्या राईडमध्ये बसावं असा विचार प्रत्येकाच्या मनात येतो पण चुकूनही अशी घाई करू नका. असं करणं नुकतंच तीन मुलींच्या अगदी चांगलंच अंगाशी आलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या तीन मुलींच्या व्हिडीओ मध्ये नेमकं काय घडलंय? चला तर पाहूयात…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

punjabi_industry या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला हजारो व्ह्यूज व कमेंट्स आहेत. खरंतर कोणत्याही वॉटरपार्कमधील साधारण वाटावा असा हा व्हिडीओ आहे पण त्यात काही सेकंदातच जे घडतं ते पाहून तुम्हालाही हसावं की घाबरावं असा प्रश्न पडेल. आपण व्हिडीओ मध्ये बघू शकता की स्विमवेअर घातलेल्या दोन मुली एकाच वेळी वॉटर स्लाईड वरून जात आहेत. यावेळी पुढे बसलेली मुलगी स्लाईडमध्ये अडकून बसते अशावेळी मागून तिसरी मुलगी सुसाट वेगात येते आणि तिच्या वेगाने पुढच्या अडकलेल्या तरुणी सुद्धा ढकलल्या जातात.

Black Hole Sound: अंतराळातून येत आहेत रडण्याचे विचित्र आवाज; NASA ने सांगितले, असं होतंय कारण..

तरुणींचा व्हायरल व्हिडिओ

Video: महिला मंडळाच्या मीटिंग मध्ये साडी नेसून केलेला ‘हा’ काला चष्मा डान्स घालतोय नेटकऱ्यांना भुरळ

व्हिडीओमध्ये दिसणारी तिसरी मुलगी ही पोटावर झोपून स्लाईड होताना दिसत आहे आणि तिच्या वेगात पुढच्या दोन मुली सुद्धा बेसावधपणे ढकलल्या जातात. या तरुणींना कोणतीही गंभीर इजा झालेली नाही मात्र या व्हिडिओमुळे त्यांची फजिती मार चांगलीच चर्चेत आली आहे. अनेकांनी या व्हिडिओवर हसणारे ईमोजी कमेंट केले आहेत.