छेड काढणा-या रोड रोमियोला भर रस्त्यात चोप मिळाला आहे. या रोड रोमियोला बांबूने चोप देतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हिंमत दाखवून अशा रोड रोमियोला धडा शिकवल्याबद्दल या मुलींचे कौतुक होत आहे. भुवनेश्र्वरमध्ये हा प्रकार घडला आहे. येथल्या उत्कल विद्यापीठाच्या कँपस परिसरात हा प्रकार घडला.रविवारी संध्याकाळी साडेतीनच्या सुमारास कॉलेमधले लेक्चर संपवून ही मुलगी आपल्या हॉस्टेलच्या दिशेने जात होती. तेव्हा दारू पिऊन आलेल्या या माणसाने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. छेड काढणारा हा माणूस एका प्रायव्हेट क्लासेसमध्ये शिकवण्या घेत असल्याचे समजते आहे. या व्यक्तीने मुलीला एकटे हेरून तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. तसेच अश्लिल हावभाव देखील केले. त्यामुळे या मुलीने घडलेला सगळा प्रकार आपल्या  मैत्रिणीला फोनवर सांगितला. त्यानंतर तिची दुसरी मैत्रिण या मुलीच्या मदतीला धावून आली.या दोघींनी मिळून बांबूने त्याला चांगलाच चोप दिला. त्यानंतर पोलीसांनी या दारूड्याला ताब्यात घेतले. सध्या हा दारूडा पोलीसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी केली जात आहे. दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सगळ्यांनी या दोन मुलींच्या धाडसाबद्दल त्यांचे कौतुक केले आहे.

Story img Loader