Viral Video: सोशल मीडियावर नेहमीच काही ना काहीतरी व्हायरल होतच असतं. अनेकदा त्यावर अपघाताचेही अनेक व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहतो. जे समोर येताच काही क्षणांत लाखो व्ह्युज आणि लाइक्स मिळवतात. नुकताच असाच एक थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात दोन तरुणी स्टंड करायच्या नादात असं काहीतरी करतात ज्यामुळे त्यांचा अपघात होतो. या व्हिडीओवर नेटकरी देखील तीव्र संताप व्यक्त करताना दिसत आहेत.

हल्लीचे तरुण-तरुणी गाडी चालवताना रील्स काढणे, डान्स करणे, जीवघेणे स्टंड करणे, इतर गाड्यांना मागे टाकून पुढे जाण्याचा प्रयत्न करणे अशा अनेक गोष्टी करताना दिसतात. पण अनेकदा या हलगर्जीपणामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागतो. या व्हिडीओमध्ये देखील दोन तरुणी असाच जीवघेणा स्टंड करत आहेत जो त्यांना महागात पडला.

Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
small girls in the street
‘मोठा मॅटर झाला…’ गल्लीतल्या दोन मुलींचं झालं भांडण; एकमेकींना धमकी देत असं काही म्हणाल्या… VIDEO पाहून हसाल पोट धरून
Shocking video dehradun raipur two girls fight for boy friend video viral on social media
कपडे फाटले तरी त्या थांबल्या नाही; एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
MIDC police Thane, woman petrol pump director threatened, MIDC police Thane range,
उपराजधानीत गुंडगिरीचा कळस, भीतीपोटी पेट्रोलपंप चालक महिलेचे गुंडांच्या पायावर लोटांगण… व्हिडीओ व्हायरल

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन तरुणी हायवे रोड वरुन स्कुटीवरुन जात आहेत यातील एक तरुण स्कुटी चालवत असून दुसरी तरुणी मागे उभी राहिलेली दिसत आहे. यावेळी अचानक एक बाईक रायडर त्यांच्या बाजूने वेगाने गाडी घेऊन जातो, शिवाय जाता जाता तो मागे बसलेल्या तरुणीला हाताने बाय करतो. त्यावेळी तरुणी देखील बाईक रायडरला बाय करते. बाईक रायडर स्पीडने पुढे निघून जातो, बाईक रायडरप्रमाणे आपणंही स्पीडने जावं म्हणून स्कुटी चालवणारी तरुणी स्पीड वाढवते आणि पुढे जाऊन त्या दोघीही जोरात रस्त्यावर पडतात.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून हा इन्स्टाग्रामवरील @posting_r1m या अकाउन्टवर शेअर करण्यात आला आहे. शिवाय या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास ३० मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत तर यावर एक मिलियनहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत शिवाय अनेक नेटकरी देखील यावर कमेंट्स करताना दिसत आहे.

यावर एका नेटकऱ्याने लिहिलंय की, “पप्पांची परी गेली कोमात”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “यांच्या घरचे यांच्या हातात गाडी का देतात”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “मागच्या मुलीची चुकी आहे”. तर आणखी एका युजरने गमतीमध्ये लिहिलंय की, “गाडीची चुकी आहे”

हेही वाचा: एक्झिट पोलच्या भाकितावर खुश होऊन भाजपा नेत्याची ११ प्रकारच्या २०१ किलो लाडूची ऑर्डर; VIDEO पाहून युजर्स म्हणाले, “तुमचा अंदाज चुकेल”

पाहा व्हिडीओ:

दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यात काही तरुण चालू कारमध्ये रील बनवत होते, त्यामुळे अचानक त्यांच्या गाडीचा अपघात झाला होता. तर आणखी एका व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका तरुणीने स्कुटीवरुन जाताना हत्तीला धक्का दिला होता.

Story img Loader