Two Guys Fight Inside Bengaluru Metro : दिल्ली मेट्रोमध्ये कधी काय घडेल ते सांगता येत नाही. कधी कोण बिकिनी घालून कॅट वॉक करते, तर कधी कोणी जोडपे प्रवाशांसमोरच अश्लील चाळे करताना दिसते, कोणी सीटसाठी एकमेकांशी तुफान हाणामारी करताना दिसतात, अनेकदा महिला प्रवाशांमध्ये सीटवरून मारामारी होताना दिसते. आता बंगळुरू मेट्रोमधील एक नवा व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यात चक्क दोन पुरुष प्रवासी एकमेकांना मारहाण करताना दिसतायत. ही परिस्थिती अनेकदा दिल्ली मेट्रो आणि मुंबई लोकल, बसमध्येही पाहायला मिळते. आता बंगळुरू मेट्रोतील यासंबंधीचा एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हिडीओमध्ये प्रवाशांनी खचाखच भरलेल्या मेट्रोच्या कोचमध्ये दोन पुरुष प्रवाशांमध्ये कोणत्या तरी कारणावरून वाद होतो. त्यानंतर ते दोघे एकमेकांवर हात उचलत मारामारी करू लागतात. मेट्रोतील गर्दीत धक्काबुक्की झाली, यावरूनच दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि शेवटी हा वाद हाणामारीपर्यंत जाऊन पोहोचला.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला कॉलर पकडून मारू लागते. यावेळी दोघे एकमेकांना बुक्के मारू लागतात. या घटनेच्या वेळी मेट्रोमधील इतर लोक दोघांचे भांडण सोडविण्याचाही प्रयत्न करतात. त्या दोघांतील एक व्यक्ती दुसऱ्याला रागाने मारत राहते. इतकेच नाही, तर त्याचा हात फिरवून पुन्हा त्याच्या तोंडावर गुद्दा मारते.

हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओवर लोक खूप कमेंट्स करीत आहेत. एका युजरने लिहिले की, आज लोक कोणाचा एक शब्दही सहन करून घेत नाहीत. मग ते एकमेकांचा जीव घेण्यासाठीही ते मागे-पुढे पाहत नाहीत. यावेळी दुसऱ्या एका व्यक्तीने आनंद घेत लिहिले की, मेट्रोचा कुस्तीचा आखाडा घोषित करावे. तिसऱ्या युजरने लिहिले की, ही परिस्थिती दिल्ली मेट्रोसारखी आहे. आणखी एकाने लिहिले की, मेट्रोमध्ये हे रोजचेच दृश्य झाले आहे.

काही महिन्यांपूर्वीही दिल्ली मेट्रोमधील दोन महिलांच्या भांडणाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये सीटवर बसण्यावरून दोन महिला एकमेंकींना मारहाण करीत होत्या. त्यावेळी एका महिलेने दुसऱ्या महिलेला मोठ्या आवाजात ओरडून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ही शिवीगाळ ऐकून इतर महिलाही रागावल्या होत्या आणि ती म्हणते की, तुला चपलेने मारेन. त्यावर प्रत्युत्तर देत महिला म्हणाली की, चपलेने मारू नका, बेल्टने मारा, गोळी मारा. आता चपलेने मारण्याचे युग गेले; गोळ्यांचे युग आले. कोणत्या युगात जगताय?

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two guys fight inside bengaluru metro train over push and shove video viral sjr
Show comments