सोशल मीडियावर आपण जेसीबीने (JCB) उत्खनन करतानाचे अनेक व्हिडीओ पाहिले आहेत. हे व्हिडीओ पूर्वी खूप ट्रेंड करत होते. आता पुन्हा एकदा जेसीबी चर्चेत आला आहे. जेसीबीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
तीन जेसीबींमध्ये जोरदार लढत
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तीन जेसीबींमध्ये जोरदार लढत पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहू शकता की दोन जेसीबी मिळून एका जेसीबीवर आपला जोर दाखवत आहेत.व्हिडीओ पाहून असे दिसते की, तीनही जेसीबी एका बांधकामाच्या जागेवर उभे आहेत. एका बाजूला एक जेसीबी उभा आहे, तर दुसऱ्या बाजूला दोन जेसीबी आहेत. दोन्ही जेसीबी मिळून आधीच्या जेसीबीवर हल्ला करतात. दोन जेसीबीच्या हल्ल्याने सुरवातीला पहिला जेसीबी घाबरून गेल्याचे पाहायला मिळते.
(हे ही वाचा: Video: मानवी वस्तीत शिरलेल्या दोन सिंहानी बैलाला घेरले, मग काय झाले ते तुम्ही बघाच…)
(हे ही वाचा: पिंजऱ्याचे गेट उघडताच सिंहाने केअरटेकरवर मारली उडी अन्… बघा Viral Video)
तिसऱ्या जेसीबीने दिले प्रत्युत्तर
मात्र, यानंतर तिसऱ्या जेसीबीने या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. हा व्हिडीओ कुठला आहे हे सध्या तरी कळू शकलेले नाही. bridlove_store नावाच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये फक्त जेसीबी दिसत आहे, त्यात कोणीही दिसत नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.