एक भयानक आणि धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही काही मिनिटांसाठी स्तब्ध व्हाल. या व्हायरल व्हिडीओमध्ये दोन मुले रेल्वे ट्रॅकवरून धावत असल्याचे दिसत आहे, तेवढ्यात एक ट्रेन येते. रेल्वे ट्रॅकवरून धावणारी मुले आणि ट्रेनमध्ये फक्त १ सेकंदाचं अंतर होतं. यापुढे जे घडतं ते पाहून तुम्ही हादरून जाल.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर असं दिसतं की दोन्ही मुलांनी आपआपसांत शर्यत लावली असावी. हा व्हिडीओ कॅनडामधल्या टोरंटो शहरातला असल्याचं सांगण्यात येतंय.
आणखी वाचा : हम साथ साथ है! माकडांचा हा VIRAL VIDEO पाहून नेटकऱ्यांना आठवला महामारीचा काळ
‘मेट्रोलिनक्स’ नावाच्या एका ट्विटर यूजरने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये दोन मुलं रेल्वे ट्रॅकवर कशी मस्ती करत पळत होती, हे पाहायला मिळत आहे. ट्रेनचा वेग खूप जास्त होता. मस्तीच्या नादात ही मुलं ट्रेनखाली येतात की काय अशी भीती मनात वाटू लागते. पण सुदैवाने आपल्यामागून ट्रेन येत असल्याचं पाहून ही दोन्ही मुलं वेगाने पळू लागले. जेव्हा ट्रेन अतिशय जवळ आली त्यानंतर या मुलांनी रेल्वे ट्रॅकवरून उतरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
आणखी वाचा : वा रं पठ्ठ्या! अवघ्या एका सेकंदात सोडवलं रुबिक्स क्यूब, कसं ते पाहा हा VIRAL VIDEO
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : कांगारूची एका व्यक्तीसोबत जबरदस्त फाईट, रागाच्या भरात त्याला इतका आपटला की.. पाहा हा VIRAL VIDEO
हा व्हिडीओ ट्रेनमधून शूट करण्यात आल्याचं दिसून येतंय. या घटनेत मुलांनी रेल्वे ट्रॅकवरून खाली उतरण्यास थोडा जरी उशीर झाला असता तर कदाचित त्यांचा जीव गेला असता. लोक हा व्हिडीओ शेअर करत असं धाडस न करण्याचा आवाहन करताना दिसून येत आहेत. तर काही युजर्सनी या मस्तीखोर मुलांना योग्य शिक्षा मिळायला हवी, अशी कमेंट केली आहे.