Viral vide: बसमध्ये ट्रेनमध्ये प्रवाशांमध्ये होणारी भांडणं काही नवी नाही. रोज म्हंटलं तरी एकतरी भांडण प्रवासात पाहायला मिळतंच. याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी सीटवरुन भांडणं होतात तर कधी भांडणाला फक्त निमित्त पुरेसं असतं. गेल्या काही दिवसांपासून ट्रेनमध्ये बसमध्ये झालेल्या मारामारीचे आणि भांडणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. महिलांमधील हाणामारी काही नवीन नाही. जागेच्या वादातून महिलांमध्ये तुफान मारामारीचे अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहेत. सध्या असाच एक बसमधला व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी गेलाय म्हणजेच नेमकं काय झालं पाहा.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, महिलांमध्ये बसण्याच्या जागेवरुन जोरदार भांडणं सुरु आहे. यामध्ये एक वयस्कर महिला आणि एक तरुण आणि तरुणी दिसत आहेत. बसमध्ये सीटवरुन झालेला हा वाद शेवटी हाणामारीवर येऊन पोहचतो. शाब्दीक भांडणाचं रुपांतर मारामारीपर्यंत कोणालाचं समजलं नाही. त्यावेळी आजूबाजूला असलेले प्रवासी त्या महिला प्रवाशांना शांत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण त्याचवेळी हे भांडण कमी होण्याऐवजी जास्त होत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही खरंच डोक्याला हात लावाल.
या व्हिडीओमध्ये सीटवरुन भांडण झाल्याचं दिसतंय, यावेळी एक तरुणी आणि एका वृद्ध महिलेचं जोरदार भांडण सुरु आहे. मात्र मध्येच एक तरुणही येतो, हा तरुण या तरुणीसोबत असल्यानं तोही तिच्या बाजूनं भांडू लागतो. यावेळी दोन महिलांमधील भांडण सोडवायला आलेल्या तरुणानंचं मार खाल्लाय. तरुणाला महिला मारहाण करताना दिसत आहे, तसेच त्याला सीटवरुन उठूनही देत नाहीये. बरेच जण मध्यस्थी करत आहेत, महिलेला समजावत आहेत मात्र, महिला कोणाचंही ऐकायला तयार नाही. महिलांच्या भांडणाशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ फक्त बघितलेच जात नाहीत तर ते तितकेच शेअर देखील केले जातात. या भांडणाचं पुढे काय झालं याबद्दल काहीही माहिती मिळालेली नाही.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> ट्रॅफिकमधून वाट काढताना बाईकचालक दोन बसच्या मधोमध अडकला; अतिघाई करणाऱ्यांनो हा VIDEO एकदा पाहाच
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. नेटकऱ्यांना ही घटना अजिबात आवडलेली नाही. त्यांनी यासंबंधीच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये नोंदवल्या आहेत.