सोशल मीडियावर जंगलाशी आणि जंगलातील प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ आपलं मनोरंजन करणारे असतात तर काही अंगावार शहारा आणणारे असतात. असे व्हिडीओ पाहून अनेकदा आपल्याला डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण होते. तसेच अनेक लोकांना जंगलातील प्राण्यांच्या शिकारीचे व्हिडीओ पाहायला खूप आवडतं. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक म्हैस आणि दोन सिंह एकमेकांशी भिडल्याचं पाहायला मिळत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये म्हैस पूर्ण ताकदीने दोन सिंहांचा सामना करताना दिसच आहे. यावेळी एक सिंह तिच्या मानेला लटकत आहे तर दुसरा सिंह म्हशीच्या पायांवर हल्ला करताना दिसत आहे. परंतु याचवेळी म्हैस दोन्ही सिंहाना जोराचा झटका देते, तरीही सिंह तिच्यावर हल्ला करणं बंद करत नाहीत. शेवटी म्हैस त्यांना शिंगाने दाबण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे सिंह घाबरुन तिथून निघून जाताना दिसत आहेत.

हेही पाहा- VIDEO: समुद्रात अंघोळ करायला गेलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर चिकटला ‘ऑक्टोपस’, सुटका करताना डॉक्टरांच्या आले नाकी नऊ

धक्कादायक बाब म्हणजे सिंहांशी लढणारी म्हैस तिथे उभ्या असणाऱ्या पर्यटकांच्या गाडीवर हल्ला करण्यासाठी वेगाने धावत येताना दिसत आहे. त्याचवेळी म्हशीच्या पाठीमागून सिंह हल्ला करण्यासाठी धावत येतात, परंतु त्यांना म्हशीवर हल्ला करण्याची संधी मिळत नाही, कारण म्हैस तेथील एका तलावाच्या दिशेने धावत जाताना दिसत आहे.

म्हशीच्या आणि सिंहाच्या भांडणाचा हा व्हिडीओ एक्सवर (ट्विटर) @Animal_WorId नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. २ मिनिट २० सेकंदाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण झालं आहे. हा व्हिडीओ जुना असला तरी तो सोशल मीडियावर पुन्हा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिवाय तो नेटकऱ्यांनाही खूप आवडल्याचं पाहायला मिळत आहे.

Story img Loader