Viral Video of Rhino and Lion from Jungle:  सोशल मीडियामुळे नेहमीच विविध व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहतो. ज्यात कधी आपले मनोरंजन करणारे व्हिडीओ असतात, तर कधी आपल्या काळजाचा थरकाप उडवणारे व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये अनेकदा जंगलातील प्राण्यांच्या व्हिडीओचा समावेश असतो. अशा व्हिडीओंमध्ये अनेकदा कधी वाघ, बिबट्या यांसारखे हिंस्र प्राणी एखाद्या प्राण्याची शिकार करताना दिसतात; तर काही प्राण्यांमध्ये भांडण वा मैत्री पाहायला मिळते. प्राण्यांचे असे व्हिडीओ नेहमीच युजर्सचे लक्ष वेधून घेतात. वन्य प्राण्यांशी संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात.

आयुष्यात प्रत्येकाला संकटाला सामोरं जावं लागतं. सगळ्यांच्या समोर कधी ना कधी एक मोठं संकट उभं राहतं. प्रत्येकाला त्यातून बाहेर निघायचं असतं, सगळेचं प्रयत्न करतात. परंतु, प्रत्येकाला यश मिळतं असं नाही. सगळ्यात जास्त संघर्ष प्राण्यांना जंगलात करावा लागतो. सिंह हा जंगलाचा राजा आहे हे सर्वांना माहीत आहे. मोठे प्राणीही सिंहापुढे शरण जातात. पण, आता असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही.

सध्या सोशल मीडियावर सिंह आणि गेंड्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन सिंह मांजरासारखे वागताना दिसत आहेत. गेंडा शरीराने अवाढव्य प्राणी आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दोन मोठे सिंह जमिनीवर बसलेले दिसतील. अचानक मागून दोन गेंडे येतात आणि दोन्ही सिंह शांतपणे उठून काठावर उभे राहतात. इतकंच नाही तर गेंडा थोडा जवळ येऊन उभा राहिल्यावर सिंह शांतपणे तिथून दूर जाऊ लागतात. त्या दोघांकडे बघून असं वाटतयं की, ते गेंड्यांना बघून घाबरले आणि तिथून उठून पळाले.

हा व्हिडीओ X वर वेगाने व्हायरल होत आहे. युजर्सनाही हा व्हिडीओ खूप आवडला आहे. हे X च्या हँडल @AMAZlNGNATURE वर शेअर केले गेले आहे. व्हिडीओसोबतच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे, “म्हणजे हा गेंडा जंगलाचा राजा का?” या व्हिडीओला आतापर्यंत चार लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक युजर्सनी यावर कमेंटही केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “सिंह आज लढण्याच्या मूडमध्ये नाही असे दिसते.”

येथे पाहा व्हिडीओ

तर आणखी एका युजरने लिहिले, “गेंडा आकाराने खूप मोठा असला तरी, पण जंगलाचा राजा सिंह आहे.” तर तिसऱ्या युजरने लिहिले, “सिंह हा जंगलाचा राजा आहे, कारण तो हुशारीने लढतो.” हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय म्हणायचे आहे? कृपया आपले मत कमेंट करा.