जंगलातील भयानक प्राण्यांपैकी सिंह एक आहे. शिकारीच्या बाबतीत तर सिंह खूपच तत्पर आणि धोकादायक आहे. तो त्याची शिकार सहजासहजी सोडत नाही. त्यामुळे अनेकांच्या मनात त्याच्याविषयी दहशत आहे. एकदा का प्राणी त्यांच्या तावडीत आला की त्यातून सुटणे अवघडच नाही तर अशक्यही होते. बाकीचे प्राणी सिंहाला पाहून मार्ग बदलतात. कारण त्याचा बळी कोणालाच व्हायचा नाही. एखाद्या महिलेसाठी दोन पुरूष लढताना तुम्ही अनेकवेळा पाहिले असतील. पण दोन प्राण्यांना असे लढताना तुम्ही क्वचित पाहिले असेल. तुम्ही कधी सिंहाला सिंहाशी लढताना पाहिलं आहे आणि तेही सिंहिणीला मिळवण्यासाठी? वास्तविक जीवनात असे तुम्ही क्वचितच पाहिले असेल. पण असे दृश्य एका व्हिडिओमध्ये पाहायला मिळाले आहे.
‘लायन फाईट’ नावाच्या अकाऊंटवरून दोन सिंहांच्या लढतीचा व्हिडिओ यूट्यूबवर पोस्ट करण्यात आला आहे. एका सिंहिणीला मिळवण्यासाठी दोन्ही सिंह एकमेकांसोबत भिडले आहेत. रक्तबंबाळ अवस्थेत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सिंहाला शेजारी बसलेले पाहून दुसरा सिंह संतापला आणि धावत जाऊन त्याच्यावर हल्ला केला. यादरम्यान सिंहीण तिथून पळताना दिसली.दोन्ही सिंहांची गर्जना आणि झुंज एवढी जबरदस्त होती की सिंहिणीलाही मैदान सोडून पळावे लागले.
दोघांच्या भांडणात सिंहीण पसार
दोन्ही सिंहांनी एकमेकांना अनेक जखमा केल्या. या मारामारीत एक सिंह इतका गंभीर जखमी झाला की त्याच्या तोंडातून रक्त येऊ लागले. तर दुसऱ्या सिंहाने लढत जिंकली. याच क्लिपमध्ये आणखी एक व्हिडिओ आहे, ज्यामध्ये दोन सिंह पुन्हा एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. यादरम्यान तेथे अनेक सिंहीणही उपस्थित होत्या ज्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती सिंहांना लढण्यापासून रोखू शकली नाही.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – Optical Illusion : चित्रात २ मुलं शोधू शकता का? हुशार माणसंच सांगू शकतील ५ सेकंदात उत्तर
या व्हिडिओच्या शेवटी सिंह गंभीर जखमी अवस्थेत दिसत आहे. सिंहाच्या नाकाखालील भागातून रक्त येत आहे. तर दुसरा सिंह आपल्या सिंहीणीसोबत एकांतात गर्जना करू लागतो.