हिवाळा ऋतू आला की, अनेक पर्यटक बर्फाळ प्रदेशात फिरायला जातात. जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात काश्मीरला गेल्यावर बर्फ हाताळण्यासह बर्फवृष्टी अनुभवण्याचा आनंद मिळतो. एकंदरीतच तिथल्या बर्फाळ प्रदेशाचा मनसोक्त आनंद लुटण्याची मजा काही वेगळीच असते. काश्मीरला जाऊन कुटुंबातील सदस्य किंवा मित्र-मैत्रिणी यांच्याबरोबर बर्फात खेळणे, बर्फाचे गोळे एकमेकांवर फेकणे आदी गोष्टी करण्यात खूप मजा येते. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. इथे दोन चिमुकल्या बर्फवृष्टीचा आनंद घेताना दिसत आहे.
काश्मीरच्या या चिमुकल्या जुळ्या बहिणी आहेत. दोघींनी अगदीच सारखे पोशाख, बूट, कानटोपी परिधान केली आहे. रस्त्यावर सर्वत्र बर्फ पसरलेला पाहून एक चिमुकली म्हणते आहे की, सर्वत्र दुधाच्या लाटा पसरल्या आहेत. तर दुसरी म्हणते आहे की, सर्दी तर लागते आहे; पण मजासुद्धा करायची आहे, असे व्हिडीओत दिसते आहे. पाहा या दोन चिमुकल्यांचा मजेशीर व्हिडीओ.
हेही वाचा…जिद्द अन् चिकाटी! नातवाच्या मदतीने ९५ वर्षीय आजी पहिल्यांदा चालवतायत गाडी; पाहा व्हायरल VIDEO
व्हिडीओ नक्की बघा :
सगळ्यात आधी सोशल मीडियावर @SrinagarGirl या युजरने ‘मी आज व्हॉट्सअॅपवर पाहिलेली सर्वांत सुंदर गोष्ट’, असे म्हणत हा व्हिडीओ शेअर केला होता; जो सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी पाहिला आणि रिपोस्ट केला आहे. तसेच व्हिडीओ शेअर करीत, ‘स्लेज ऑन स्नो किंवा बर्फावर शायरी. माझे मत (वोट) दुसऱ्या चिमुकलीला जाते’, अशी कॅप्शन आनंद महिंद्रा यांनी या व्हिडीओला दिली आहे.
बर्फवृष्टी पाहून दोन्ही चिमुकल्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय आणि त्या जशी शायरी सादर केली जाते अगदी त्याचप्रमाणे विविध शब्दांत त्यांच्या भावना मांडताना दिसत आहेत. या दोन्ही चिमुकल्यांचे हावभाव, त्यांची बर्फाचे वर्णन करण्याची स्टाईल तुमचेही मन जिंकून घेईल एवढं नक्की. सोशल मीडियावर आनंद महिंद्रा यांच्या अधिकृत @anandmahindra या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे; जो अनेकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.