Train Passengers Clash Over Seat Issues: भारतीय रेल्वेतून रोज जवळपास लाखो लोक प्रवास करीत असतात. त्यातील जास्तीत जास्त प्रवासी हे स्लीपर अथवा जनरल क्लासमधून प्रवास करतात. ट्रेनमधून प्रवास करताना अनेकदा आपण कडाक्याच्या होणाऱ्या भांडणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहतो. कधी गर्दीच्या ठिकाणी रस्त्यात मारामारी सुरू झाली, तर लोक थांबून ही भांडणं बघतात. काही वेळा ट्रेनमध्ये जागेवरून भांडणं होतात. अशा भांडणांचे व्हिडीओ काढून ते सोशल मीडियावर टाकले जातात. नेटकरीही असे व्हिडीओ आवर्जून पाहतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. काही वेळा गोष्टी इतक्या मजेदार असतात की, लोकांना पाहून प्रचंड आश्चर्य वाटतं; तर कधी धक्कादेखील बसतो. मेट्रो, बस व ट्रेनमध्ये सीटवरून लोकांमध्ये हाणामारी होते आणि त्यानंतर त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो. जेव्हा लोक छोट्या छोट्या गोष्टींवर आपापसांत भांडू लागतात तेव्हा आश्चर्य वाटते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; ज्यामध्ये एक पुरुष आणि एक जोडपे एका जागेसाठी भांडताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये काय दिसत आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो.

Local Train Shocking Video viral
लोकल ट्रेनच्या दरवाजावर उभे राहून प्रवास करणाऱ्यांनो ‘हा’ धक्कादायक VIDEO एकदा पाहाच; तुमच्याबरोबरही घडू शकेल अशी घटना
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Viral Video Drunk Man Pinned Down By Ticket Checker Train Attendant Flogs Him
“लाथा-बुक्या मारल्या, अन् पट्ट्याने धू धू धूतले! तरुणीला छेडणाऱ्या मद्यधुंद व्यक्तीला टीसी आणि ट्रेन अटेंडंटने दिला चोप, Video Viral
Man Risks Life to Catch Running Train
VIDEO : जीव एवढा स्वस्त असतो का? धावती रेल्वे पकडण्यासाठी थेट रुळावर मारली उडी अन्.. नेटकरी म्हणाले, “जबाबदारी नाही तर मुर्खपणा आहे..”
Mother love Viral Video
‘शेवटी त्यालाही कळली आईची माया…’ मुलाला भेटण्यासाठी आतुर झालेल्या आईची ट्रेन गार्डने केली मदत; हृदयस्पर्शी VIDEO पाहून व्हाल भावूक
indian railway handicap passenger break train door
रेल्वे प्रशासन आहे कुठे? अपंग प्रवाशाचे हे हाल तर सर्वसामान्यांच काय? VIDEO पाहून तुम्हीच सांगा हे कितपत योग्य
Vande Bharat sleeper
Vande Bharat Sleeper Train Video : वंदे भारत स्लीपर ट्रेनने गाठला १८० किलोमीटर प्रतितास वेग; चाचणीचा Video आला समोर
Man Vandalizes Train Coach In Viral Video Made For Instagram Reel Sparks Outrage
रीलसाठी तरुणाने रेल्वेच्या डब्यातील सीट कव्हर फाडले अन् चालत्या ट्रेनच्या खिडकीतून…Viral Video पाहून भडकले नेटकरी

(हे ही वाचा : जास्त खाल्ल्याने २४ वर्षीय तरुणीचा मृत्यू; सतत ‘इतके’ तास खाण्याची सवय, लाइव्ह स्ट्रीमिंगदरम्यान सोडला जीव )

भांडणाचा व्हिडीओ व्हायरल

ट्रेन नेहमी प्रवाशांनी खचाखच भरलेली असते. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक जोडपे खिडकीच्या सीटजवळ बसलेले दिसत आहे आणि लाल टी-शर्ट घातलेली एक व्यक्ती त्यांना उठण्यास सांगत आहे; मात्र ते जागा सोडण्यास तयार नाहीत. दरम्यान, दुसऱ्या व्यक्तीने त्याला थांबवले आणि त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर सीटवर बसलेली व्यक्ती उठते आणि लाल टी-शर्ट घातलेल्या व्यक्तीशी बोलू लागते. मग त्या दोघांमध्ये जागेवरून वाद सुरू झाला. दरम्यान, तिथे बसलेली महिलाही भांडणात सामील होते आणि वाद अधिक वाढतो. यादरम्यान ट्रेनमध्ये बसलेले इतर लोक त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात; मात्र त्यांचा वाद सुरूच राहतो.

व्हायरल व्हिडीओ येथे पहा

हा व्हिडीओ मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर @gharkekalesh नावाच्या खात्यासह शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘भारतीय रेल्वेच्या जनरल कोचमध्ये प्रवाशांमध्ये सीटबाबत वाद झाला.’ वृत्त लिहेपर्यंत एक लाख ७५ हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, “ही रोजची सीटची समस्या आहे.” आणखी एका युजरने लिहिले, “लाल टी-शर्ट घातलेल्या व्यक्तीला कशाचा अभिमान आहे?” तिसऱ्या युजरने लिहिले, “या सीटची समस्या संपूर्ण भारताची समस्या आहे.” आणखी एका युजरने लिहिले, “रेल्वेमध्ये आता हे रोजचेच झाले आहे.”

Story img Loader