शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं कायम म्हंटलं जातं. त्यामुळे युक्ती वापरत केलेलं काम कधीही लवकर आणि त्रासाशिवाय पूर्ण होतं. असे अनेक अनुभव प्रत्येकाला पावलोपावली आले असतील. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात दोन तरूण स्मार्ट वर्क करत आपलं काम पूर्ण करताना दिसत आहेत. त्यांच्या या युक्तीमुले तासाभराचं काम काही मिनिटांत पूर्ण झालं आहे. मात्र हे काम करत असताना सरावही तितकाच महत्त्वाचा आहे. अन्यथा ते काम पूर्ण तर सोडाच एका ऐवजी दोन कामं करावी लागली असती.
व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की, दोन तरुण घरात गवंडी काम करत आहेत. एक तरुण छतावर बसला आहे आणि दुसरा खाली प्लास्टर करत आहे. प्लास्टर तळापासून वरपर्यंत आणण्यासाठी तासन् तास लागतात. अशा परिस्थितीत दोन्ही तरुण स्मार्ट वर्कचा अवलंब करतात. खाली प्लास्टर बनवणारा तरुण प्लास्टर बनवतो आणि छताच्या दिशेने उचलतो. त्याचवेळी छतावर बसलेला तरुण घाईघाईत प्लास्टर पकडतो. कठोर परिश्रमांऐवजी स्मार्ट वर्क करून तरुण तासांचे काम मिनिटांत करतात.
तरुणांच्या कामाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यूजर्स वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर करत आहेत. हा व्हिडिओ अपलोड झाल्यापासून आतापर्यंत १ लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओला हजारो लोकांनी लाइकही केले आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स दोन्ही तरुणांच्या कामाचे कौतुक करताना दिसत आहेत.