सोशल मीडियावर लग्नाबाबतच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या आपण पाहत असतो. ज्यामध्ये काहींनी स्वतःशी लग्न केल्याचं तर काहींनी बाहुल्यांशी लग्न केल्याच्या बातम्या व्हायरल होत असतात. पण सध्या एका विचित्र लग्नाची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. ज्यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचे चक्क कुत्र्यांशी लग्न लावल्याची घटना उघडकीस आली आहे. ही विचित्र घटना ओडिशातील आहे. जिथे एका मुलाचे मादी कुत्र्यासोबत तर मुलीचे लग्न कुत्र्याशी लावण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील एका आदिवासी गावातील लोकांची अशी अंधश्रद्धा आहे की, दुष्ट आत्म्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी असे विवाह करावे लागतात. मचुआ सिंग याने त्याच्या ११ वर्षांचा मुलगा तपन सिंगसाठी वधू म्हणून एका मादी कुत्री आणण्यात आली होती, तर मानस सिंग याने त्याच्या ७ वर्षांची मुलगी लक्ष्मीचे लग्न एका कुत्र्याशी लावले. मचुआ आणि मानस बंदशाही गावातील हो जमातीचे सदस्य आहेत.

अशी आहे गावकऱ्यांची समजूत –

हेही पाहा- अरे भाऊ लग्नाला यायचं की नाही? ‘ही’ व्हायरल लग्नपत्रिका बघून तुम्ही डोकंच धराल

या गावातील लोकांनी आपल्या मुलांच्या लग्नासाठी कुत्र्यांचा शोध त्यावेळी सुरु केला, जेव्हा त्यांच्या मुलांचा वरच्या जबड्यात पहिला दात यायला सुरुवात झाली. कुत्र्यांशी लग्न लावून दिलं नाही तर आपल्या मुलांच्या आयुष्यावर वाईट परिणाम होऊ शकतो, अशी या आदिवासींची समजूत आहे. २८ वर्षीय सागर सिंह याने सांगितले की, समाजाच्या परंपरेनुसार हे दोन्ही लग्न समारंभ सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत चालले. यावेळी जेवणाची व्यवस्थादेखील करण्यात आली होती. शिवाय असे लग्न केल्यानंतर कुत्र्यांमध्ये वाईट आत्मा शिरतो आणि मुलांची त्यापासून सुटका होते अशीही या समाजाची समजूत आहे. परंतु या गोष्टीला कोणताही वैज्ञानिक आधार नाही, तरीही ही अंधश्रद्धेवर आधारीत परंपरा पिढ्यानपिढ्या सुरू आहे.

हेही पाहा- मोबाईल पाहण्यात पोलीस व्यस्त; शेजारी बसलेल्या गुन्हेगारावर नाही लक्ष; IPS अधिकाऱ्याने शेअर केलेला फोटो पाहून व्हाल थक्क

दरम्यान, मागील महिन्यात सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एका कुटुंबाने दोन कुत्र्यांचे मोठे लग्न आयोजित केले होते. या लग्नाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. कुत्र्यांच्या या लग्नासाठी ,सामान्य लोकांच्या लग्नात ज्या पद्धतीची सजावट केली जाते तशीच सजावट करण्यात आली होती.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two minors wedded to stray dogs in balasore to ward off evil spirits news goes viral jap
Show comments