शुक्रवारी मध्य म्यानमारमध्ये ७.७ रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपात किमान १,६४४ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि ३,४०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. थायलंड, चीन, भारत, व्हिएतनाम आणि बांगलादेशसह अनेक शेजारील देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या विनाशाच्या दरम्यान, चीनच्या युनानमधील एका हॉस्पिटलला देखील भूकंपाचा जोरदार हादरा बसला. दरम्यान यावेळी हॉस्पिटलमधील नवजात बालकांचे संरक्षण करण्यासाठी दोन प्रसूती वॉर्ड नर्सने आपला जीव धोक्यात घासून बाळांचा जीव वाचवला.
सोशल मीडियावर आता मोठ्या प्रमाणात शेअर झालेल्या या व्हिडिओमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर हॉस्पिटलमधील नवजात बाळंच्या पाळण्यांनी भरलेला एक वॉर्ड दिसतो. जोरदार हादऱ्यांमुळे हे चाक असलेले पाळणे खोलीत फिरू लागतात. एका नर्स एका बाळाला घट्ट पकडून ठेवेल. जमिनीवर बाळ पडू नये म्हणून बाळाला पाळण्यापासून रोखण्यासाठी सहजतेने ते पकडून ठेवले आहेत. जवळच उभी असलेली दुसरी नर्स भूंकापच्या धक्क्यामुळे हलणाऱ्या दोन पाळण्यांकडे वेगाने जाते.
भूकंपाची तीव्रता वाढत असताना, पाण्याचे फिल्टर जोरात हादरले आणि जमिनीवर पाणी सांडले. ओल्या जमिनीवरही बाळांना इजा होऊ नये म्हणून परिचारिकांना त्यांचा तोल राखण्यासाठी धडपड करावी लागली. भूकंपाच्या तीव्रतेने जमिनीवरून ओढल्या जाणाऱ्या पहिल्या नर्सने बाळाला घट्ट धरले आणि दुसऱ्या हाताने पाळणे एकमेकांवर आदळू नये म्हणून ते धरून ठेवले.
एका एक्स वापरकर्त्याने कमेंट केली, “संकटाच्या क्षणी, सर्वात असुरक्षित लोकांचे रक्षण करण्याची त्यांची प्रवृत्ती खरोखरच प्रेरणादायी असते.”
म्यानमारमधील भूकंप चीनमधील युनानमधील रुईली येथे जाणवला, जिथे जिंगचेंग हॉस्पिटलच्या प्रसूती केंद्रातील दोन परिचारिका बाळांना संरक्षण देताना दिसल्या:
दुसऱ्याने लिहिले, “एकाच वेळी खरोखर भयानक आणि सुंदर दोन्ही! या नर्स हिरो आहेत!”
तिसऱ्याने लिहिले की,”हे खूप हृदयस्पर्शी आहे. आपल्याला जगभरात सर्वत्र मानवता आणि करुणा दिसते,” असे एका कमेंटमध्ये म्हटले आहे.
मध्य म्यानमारमधील सागाईंगच्या वायव्येस दुपारी १२:५० वाजता (स्थानिक वेळेनुसार) भूकंप झाला. इमारती कोसळल्या, रस्ते फुटले आणि हजारो लोक ढिगाऱ्याखाली अडकले. शेजारील थायलंडमध्ये, बँकॉकमध्ये कोसळलेल्या इमारतीत अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी आपत्कालीन पथके धावत आहेत.
भारताने या आपत्तीला त्वरित प्रतिसाद दिला आहे. ऑपरेशन ब्रह्मावरील विशेष माहितीत परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्यानमारला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. भारताने बाधित भागात मानवतावादी मदत, वैद्यकीय पथके आणि मदत साहित्य तैनात केले आहे.