सोशल मीडियावर सध्या रोज काही ना काही व्हायरल होत असत. काही व्हिडीओ आपल्याला विचार करायला भाग पाडतात तर काही विनोदी असतात. काही व्हिडीओ मात्र फार विचित्र घटना दर्शवणारे असतात. असाच एक विचित्र व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या मजेशीर व्हिडीओवर मिम्स देखील तयार केले जात आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की काय आहे व्हिडीओमध्ये?

असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये ट्रेनच्या शेवटच्या डब्याच्या बाहेर दोन व्यक्ती डब्याच्या कपलिंगवर बसल्या आहेत. कपलिंग हे कंपार्टमेंटमधून बाहेर पडणारे मोठे स्प्रिंग असतात, जे कंपार्टमेंटला एकमेकांशी आदळण्यापासून वाचवतात.

(हे ही वाचा: “गडपती,गजअश्वपती,भूपती…” चिमुरडीच्या शिवगर्जनेचा अंगावर काटा आणणारा Video Viral)

कपलिंगवर बसून प्रवास

सुरुवातीला लोकांना वाटले की ट्रेन चालू झाल्यावर ते दोघ खाली उतरतील, पण ट्रेन चालवल्यानंतरही ते कपलिंगवर आरामात बसून प्रवास करताना दिसले आणि त्यांना थांबवणारे कोणी नव्हते.

(हे ही वाचा: या फोटोत लपलाय बिबट्या, तुम्ही शोधू शकता का?)

(हे ही वाचा: ‘हा’ हत्ती रस्ता वापरणाऱ्यांकडून घेतोय टोल; video होतोय व्हायरल)

व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओ इतक्या वेगाने व्हायरल झाला की memes.bks ने इंस्टाग्रामवर एक खास मीम बनवलं आहे. या पेजचे १७ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

(हे ही वाचा: अन् तो वाघाच्या मागे चालू लागला…; हा Viral Video एकदा बघाच!)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ कुठचा आणि कधीचा आहे हे माहीत नसले तरी त्यावर मीम बनवल्यानंतर आता हा व्हिडीओ लोकाचं चांगलचं मनोरंजन करत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two people sat on coupling outside compartment and traveling on a moving train video viral ttg