Tiger Attack Viral Video : आजच्या डिजीटल युगात रील्स आणि व्हिडीओ बनवण्यासाठी लोक काय करतील,याचा नेम राहिला नाही. धोका पत्करून लोकांचं मनोरंजन करण्यासाठी कीह माणसं लाखमोलाचा जीव कवडीमोल करतात. माणसांवर हल्ला करून त्यांची शिकार करणाऱ्या वाघासोबतही फोटो काढायला कही जणांना भय वाटत नाही. पण वाघ पिसाळल्यानंतर काय घडतं, हे अनेकांना ठाऊक असेलच. अशाच प्रकारचा एक भयंकर व्हिडीओ ट्वीटरवर व्हायरल झाला आहे. वाघासोबत फोटो काढणं दोन जणांना कसं महागात पडलं, हे या व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे.
दोन माणसं वाघाजवळ जाऊन फोटो काढण्याचा प्रयत्न करतात. एक मुलगा या वाघाजवळ जाऊन बसतो, तर दुसरा त्या मुलाच्या शेजारी उभा असतो. दोघेही मजेशीर अंदाजात फोटो घेत असताना अचानक वाघ पिसाळतो आणि हल्ला करण्याचा प्रयत्न करतो, असं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. एका व्यक्ती काठीने वाघाला चिडवण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी वाघ मोठी डरकाळी फोडून त्या माणसांना धडा शिकवतो. वाघ हल्ला करण्याच्या इराद्यात असतानाच दोघेही पिंजऱ्यातून पळ काढतात आणि बाहेर गेल्यावर एक व्यक्ती जमिनीवर डोकं ठेवून धरती मातेचं दर्शन घेत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.
इथे पाहा व्हिडीओ
वाघाने डरकाळी फोडल्यानंतर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही सेकंदातच या दोघांच्या अंगावर काटा उभा राहिला आणि पिंजऱ्यातून बाहेर पळाले. वाघाच्या हल्ल्यापासू थोडक्यात जीव वाचल्याने या दोघांनी मोकळा श्वास घेतला. जीव वाचल्यानंतर जमिनीवर डोकं ठेवून देवाचे आभारही मानले. हा थरारक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला असून नेटकरी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव करत आहेत.