वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या त्रिनिदाद टी10 लीगमध्ये (Trinidad T10 Blast 2022) निकोलस पूरनची बॅट धमाल केली. स्टीलपन स्ट्रायकर्स आणि लेदरबॅक जायंट्स यांच्यात झालेल्या २६व्या सामन्यात पूरनने १९ चेंडूत ४७ धावा केल्या. त्याच्या धडाकेबाज खेळीमुळे त्याचा संघ हा सामना १२ धावांनी जिंकू शकला. मात्र, यादरम्यान त्याचा एक षटकार रोखण्याच्या प्रयत्नात स्टीलपन स्ट्रायकर्सचे दोन क्षेत्ररक्षक एकमेकांवर आदळले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आठव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर ही घटना घडली जेव्हा निकोलस पूरनने लाँग ऑन आणि डीप मिडविकेटमध्ये मोठा शॉट खेळला आणि दोन्ही क्षेत्ररक्षक चेंडू पकडण्यासाठी धावले. बॉल पकडायच तर राहीलचं पण , दोन्ही खेळाडूंची एकमेकांशी जोरदार टक्कर देत झाली.

(हे ही वाचा: पीव्ही सिंधूचा ‘कच्चा बदाम’ गाण्यावर भन्नाट डान्स, Video Viral)

(हे ही वाचा: निव्वळ सात सेकंदाच्या व्हिडीओमुळे ‘ही’ मुलगी झाली Viral, नक्की काय झालं जाणून घ्या)

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत व्हायरल होता आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १४ हजाराहून अधिक लोकांनी बघितलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two players clash at the boundary in an attempt to catch nicholas pooran video viral ttg