Viral Video Today: रशियाच्या कामचटका द्वीपकल्पातील दोन ज्वालामुखी अचानक सक्रिय झाल्याने या पर्वतरांगाच्या वरील आकाशात राख व धुराचे लोट पसरू लागले आहेत केशरी रंगाचा धगधगता लावा पाहून नेटकऱ्यांच्या कदाचित तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. शास्त्रज्ञांच्या मते हे दोन ज्वालामुखी सक्रिय झाल्याने लवकरच त्यांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास याच भागातील अन्य ३० सक्रिय ज्वालामुखी सुद्धा भडकण्याची शक्यता आहे. रशियातील मॉस्कोच्या पूर्वेस सुमारे ६,६०० किलोमीटर पॅसिफिक महासागरात पसरलेला द्वीपकल्प, सुमारे ३० सक्रिय ज्वालामुखीसह जगातील सर्वात केंद्रित तप्त क्षेत्रांपैकी एक आहे.
शनिवारी या द्वीपकल्प परिसरात भूकंपाचे हादरे जाणवल्यानंतर हे दोन्ही ज्वालामुखी सक्रिय झाल्याचे समजत आहे. रशियन अकादमी ऑफ सायन्सेसच्या व्हल्कनॉलॉजी विभागाने सांगितल्याप्रमाणे, क्लुचेव्हस्काया सोपका येथे, जवळपास १६००० फुटांवर यूरेशियातील सर्वात उंच सक्रिय ज्वालामुखी आहे. सध्या या ज्वालामुखीत एका तासाला १० स्फोटांची नोंद होत आहे. ज्वालामुखीतून लावा आणि राख उत्सर्जन देखील होत असल्याचे संस्थेने म्हटले आहे.
.. अन एकाच वेळी दोन ज्वालामुखी ओकू लागले आग
हे ही वाचा << रात्री ३ वाजता ‘तो’ रुग्णाच्या भुताशी गप्पा मारू लागला? त्याची वही पाहताच..; Video पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम
असे पाहायला गेल्यास कामचटकाची लोकसंख्या कमी आहे. सुमारे ५००० लोकांच्या वस्तीचा हा छोटा शहरी भाग दोन ज्वालामुखींच्या मध्ये वसलेला आहे, या शहरापासून दोन्ही ज्वालामुखी तब्बल 30-50 किलोमीटर अंतरावर आहेतल. सध्या तरी या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे कोणतेही गंभीर नुकसान झाले नसले तरी या दोन्ही ज्वालामुखींमुळे जर येत्या काळात आजूबाजूचे ३० ज्वालामुखी सक्रिय झाले तर गंभीर संकट ओढवू शकते.