सोशल मीडियाला व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ म्हटलं जातं. रोज कोणते न कोणते व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतात. वन्यप्राण्यांचे व्हिडीओ म्हटलं की नेटकऱ्यांचा जीव की प्राण असतो. वन्यप्राण्यांची जीवनशैली आणि हरकती नेटकऱ्यांना खूपच आवडतात. त्यामुळे असे व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतात. असाच एक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणार नाही. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रात्रीच्या अंधारात ससे रस्त्याच्या मधोमध मारामारी करताना आहेत. या ठिकाणाहून जाणाऱ्या एका कारस्वाराने आपल्या कॅमेऱ्यात हे भांडण चित्रित केलं आहे. ससे सामान्यतः शांत आणि लाजाळू प्राणी समजले जातात. मानवी वस्तीजवळ येण्यास टाळाटाळ करतात आणि जंगलात राहणे पसंत करतात. अनेकदा ते शेताच्या आजूबाजूला बनवलेल्या बिळात दिसतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओला सगळ्यांची पसंती मिळत आहे.

व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये मध्यरात्री एका निर्जन रस्त्यावर दोन ससे समोरच्या एकमेकांसोबत हातापायी करताना दिसत आहेत. एखाद्या बॉक्सिंग खेळाडूप्रमाणे लढताना दिसत आहेत. सशाच्या झुंजीचा हा व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून यूजर्सना आश्चर्याचा धक्का बसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने शेअर होत आहे.

सशाच्या लढाईचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरील अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला लाखो व्ह्यूजसह हजारो यूजर्सनी लाइक केले आहे. तसेच यूजर्स त्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

Story img Loader