सोशल मीडियावर दिवसेंदिवस चित्रविचित्र व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून लोकांचं मनोरंजन होतं, तर काही व्हिडीओंच्या माध्यमातून सामाजिक सलोखा जपण्याचा संदेश दिला जातो. अशाच एका व्हायरल झालेल्या व्हिडीओनं लोकांची मनं जिंकली आहेत. एका मच्छीमाराने समुद्रात फेकलेल्या जाळ्यात खाण्याचा मासा नाही, तर चक्क् माणसांशी मैत्रीची नाळ जोडणारा डॉल्फीन मासा अडकला. त्यानंतर मच्छीमाराने जे काही केलं ते खरंच कौतुकास्पद आहे.
समुद्राच्या पाण्यात अनेक प्रजातींचे दुर्मिळ मासे तसेच जीवजंतू आढळतात. नॉन व्हेज फूड खाणाऱ्यांना मासे पकडण्याची प्रचंड आवड असते. तसेच मासळी बाजारात मासे विक्रीच्या उद्योगातून लाखो रुपयांचा धंदा होत असल्याने अनेक मच्छीमार समुद्राच्या पाण्यात बोटींवर सवारी करत असतात. अशाच एका मच्छीमाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मासे पकडण्यासाठी फेकण्यात आलेल्या जाळ्यात खाण्याचा मासा नाही तर चक्क दुर्मिळ मासा अडकला. हे जेव्हा मच्छीमाराने जाळा काढल्यानंतर पाहिलं तेव्हा त्याला धक्काच बसला. डॉल्फीन मासे माणसांशी अनेकदा त्यांच्या शैलीत संवाद साधण्याचा प्रयत्न करतात.
इथे पाहा व्हिडीओ
अशाप्रकारचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. एका मच्छीमाराने जाळ्यात अडकलेल्या दोन डॉल्फीन माशांना सुखरूप पाण्यात सोडले. हा व्हिडीओ तामिळनाडू येथील रामनाथापुरम जिल्ह्यातील आहे. डॉल्फीन जाळ्यात अडकल्यानंतर वन विभागाचे अधिकारी आणि स्थानिक लोकांच्या मदतीनं मच्छीमाराने दोन्ही डॉल्फीन माशांना पाण्यात सुखरूप सोडलं. हा व्हिडीओ आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. तसंच अशाप्रकारचं सामाजिक भान जपणाऱ्या हिरोंचा सन्मान केला जाईल, असं आश्वासनही त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिलं आहे.