सोशल मीडिया हा अनेक व्हिडीओंचा खजिना आहे. यात तुम्हात काही मनोरंजक व्हिडीओ तर काही धक्कादायक व्हिडीओ पाहिला मिळतात. छोट्या गोष्टीपासून मोठ मोठी भांडणाचे व्हिडीओही सोशल मीडियावर वाऱ्यासारखे फिरतात. याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तरुणी किंवा महिलांच्या हाणामारीचे व्हिडीओ तुफान व्हायरल होतोत. मुंबई लोकल ट्रेनमधील सीटवरुन महिलांमधील हाणामारीचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप गाजतात. अशा व्हिडीओला मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळतात. सध्या व्हायरल झालेला व्हिडीओमध्ये दोन तरुणींची भरदिवसा जबरदस्त हाणामारी पाहिला मिळते. या हाणामारीचं कारण ऐकून तुम्ही अवाक् व्हाल.
रस्त्यावरच भिडल्या शाळकरी मुली
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन शाळकरी मुली जोरदारपणे एकमेकींना मारताना दिसत आहेत. प्रियकराबद्दल दोन मुलींमध्ये झालेल्या जोरदार वादाचे रूपांतर अचानक भांडणात झाले आणि दोघांनी एकमेकांना लाथा-बुक्के मारत एकमेकांचे केस ओढण्यास सुरुवात केली. यावेळी इतर मुलींनी हस्तक्षेप करत त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला खरा पण, दोघीही एकायला तयार नव्हत्या. ‘मेरे बॉयफ्रेंडसे गुलुगुलु करेगी तो धोपटुंगी ना उसको’ हा आलिया भट्टचा डायलॉग आठवतो का? हीच आलिया भट्टचा अवतार या व्हिडीओमध्ये दिसून आलं.
पाहा व्हिडीओ
@gharkekalesh नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले असून नेटकरी अनेक प्रतिक्रिया यावर देत आहेत.