Viral Video: लॉकडाउननंतर मोबाइलचा वापर इतका वाढला आहे की, आता मैदानी खेळ कमी आणि मुलांचा स्क्रिन टाईम वाढलेला दिसत आहे. दिवसातून एखादा तास टीव्हीवर कार्टून बघण्यापर्यंत ठीक होतं, पण आताची मुलं इन्स्टाग्राम, फेसबुक, यूट्यूबवरील रील पाहण्यात एवढे उत्सुक असतात की, जी गाणी आपल्याला माहीतही नसतात ती या शाळकरी मुलांना अगदी तोंडपाठ असतात आणि या गाण्यांवर त्यांनाही काही स्टंट व्हिडीओ शूट करण्यासाठी ते इच्छुक असतात.तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये काही विद्यार्थिनी गणवेशात धोकादायक रील शूट करताना दिसल्या आहेत.

शाळकरी विद्यार्थिंनीचा एक ग्रुप ब्रिजकडेला रील शूट करण्यासाठी आल्या आहेत. यातील दोघी रील शूट करणाऱ्या विद्यार्थिनींना बघत आहेत. एक मुलगी मोबाईलमध्ये रील शूट करत आहे आणि दोघी स्टंट करताना दिसत आहेत. स्टंट करणाऱ्या दोन्ही विद्यार्थिनींनी शाळेचा गणवेश परिधान केला आहे. तर तुम्ही पाहू शकता की, एक विद्यार्थिनी दुसऱ्या विद्यार्थिनीच्या खांद्यावर चढते आणि हवेत बॅकफ्लिप मारते. पण, बॅकफ्लिप मारताना मुलीचा तोल जातो. तर नेमकं पुढे काय घडलं व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

हेही वाचा…एक, दोन हजार नव्हे तब्ब्ल ‘एवढ्या’ रुपयांचे आले वीज बिल; युजरचा स्क्रिनशॉट व्हायरल; म्हणाला, ‘आता मेणबत्ती…’

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, दोन विद्यार्थिनी धोकादायक स्टंट करत आहेत. एक विद्यार्थिनी दुसऱ्या विद्यार्थिनीच्या खांद्यावर चढते आणि हवेत बॅकफ्लिप मारते. पण, बॅकफ्लिप करताना तिचा तोल जातो आणि ती जमिनीवर आदळते. मैत्रिणीचा तोल गेला व ती पडली हे पाहून इतर विद्यार्थिनी तिच्याजवळ धावत येतात. तसेच जमिनीवर पडल्यावर तरुणीची कंबर दुखायला लागते हे तिच्या हावभावावरून स्पष्ट दिसून येत आहे. एकूणच हा अजब स्टंट करणे तिला चांगलेच महागात पडले आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @shalugymnast या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “कंबर तुटली” अशी कॅप्शनसुद्धा या व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून आले आहेत. काही युजर्स विद्यार्थिनींबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. अनेक जण असे स्टंट करू नका, कारण रस्ते, वाहनांची ये-जा करणारे ब्रिज सुरक्षित नसतात आदी अनेक कमेंट व्हिडीओखाली करताना नेटकरी दिसून आले आहेत.